• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 20, 2026
in गुन्हे
0
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगर रस्त्यावर सापळा रचून तब्बल १२ लाख ०६ हजार १०८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला ३,८६,१०८ रुपयांचा गुटखा, ८ लाख रुपयांची अर्टिगा कार (क्र. MH-30 AZ-4664) आणि २० हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

​गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी सैय्यद आरिफ सैय्यद हकीम (वय ३५) आणि खलील उल्ला खान (वय ३२, दोघे रा. खामगाव, जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी त्यांना मुक्ताईनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

​पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी झाली असून, जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात कारवाई आणखी तीव्र केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच अंमली पदार्थमुक्त समाज घडवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

ताज्या बातम्या

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add