• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांचे यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 17, 2026
in आरोग्य
0
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

जळगाव, (प्रतिनिधी) : डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या ५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजारावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार विभागाने समुपदेशन व औषधोपचारांच्या माध्यमातून यशस्वी उपचार करून रुग्णाला नवजीवन दिले आहे. विशेष म्हणजे शासनाच्या योजनेअंतर्गत या रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले.

काही वर्षांपूर्वी डोक्याला गंभीर मार लागल्यानंतर संबंधित रुग्णाच्या वागणुकीत हळूहळू बदल होऊ लागले. तो स्वतःशीच सतत बडबड करणे, कोणतेही कारण नसताना अचानक रडू येणे, कुटुंबातील सदस्यांवर विनाकारण संशय घेणे, कोणाशीही संवाद न साधणे तसेच जेवण करण्यास नकार देणे अशा गंभीर मानसिक लक्षणांमुळे कुटुंबीय मोठ्या चिंतेत होते. विविध ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी रुग्णाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

रुग्णाची मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉक्टर हुमेद महाडीक, डॉ. आशिष येवले, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. निकीता खटवानी, डॉ. अभिलाषा राठोड, डॉ. सोनजी गायकवाड, डॉ. रेशल श्रीवास्तव, डॉ. फरीन सुरैय्या यांनी सखोल तपासणी करून त्याला स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचे निदान केले. त्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार, नियमित समुपदेशन, मानसिक स्थितीचे सातत्याने निरीक्षण तसेच कुटुंबीयांनाही आजाराविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

उपचारादरम्यान डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांनी समन्वयाने उपचार केल्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत टप्प्याटप्प्याने लक्षणीय सुधारणा दिसून आली. उपचारानंतर रुग्णाची स्वतःशी बडबड करण्याची सवय कमी झाली असून, संशयी वृत्तीवर नियंत्रण आले आहे. त्याचबरोबर तो नियमित जेवण करू लागला असून कुटुंबीयांशी संवाद साधण्यासही सुरुवात केली आहे. मानसिक आरोग्यात झालेल्या या सकारात्मक बदलामुळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले.

◾स्किझोफ्रेनिया हा गंभीर असला तरी योग्य वेळी निदान, नियमित औषधोपचार, समुपदेशन आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळाल्यास रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते. मानसिक आजार लपवून न ठेवता तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास ते पुन्हा सामान्य जीवन जगू शकतात.
– डॉ. निकीता खटवानी
डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add