• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भु-करमापकावर १५ हजारांची लाच घेताना जळगावात एसीबीचा यशस्वी सापळा; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 2, 2026
in गुन्हे
0
भु-करमापकावर १५ हजारांची लाच घेताना जळगावात एसीबीचा यशस्वी सापळा; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालयातील लोकसेवक (भुकरमापक) जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५, रा. भूषण कॉलनी, जळगाव) याला तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (१ जुलै) रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, आरोपीविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.

​मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या जळगाव शहरातील वडिलापार्जित घराच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केली होती. या विरोधात जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय, जळगाव येथे अपील केले असता, उतारा अद्यावत करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. परंतु, यावर कोणतीही कारवाई न झाल्याने तक्रारदाराने १८ जून २०२६ रोजी कार्यालयात चौकशी केली.

​त्यावेळी भुकरमापक जितेंद्र पाटील याने हे काम करून देण्यासाठी साहेबांसाठी १०,००० रुपये आणि स्वतःसाठी ५,००० रुपये अशा एकूण १५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २५ जून २०२६ रोजी एसीबी जळगाव कार्यालयाकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, पाटील याने पंचांसमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार भूमि अभिलेख कार्यालयात सापळा रचून तक्रारदाराकडून १५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना जितेंद्र पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले.

​ही यशस्वी कारवाई ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि सापळा पथकातील अंमलदार सुरेश पाटील, संगीता पवार, राकेश दुसाने, प्रदीप पोळ व मनोज पाटील यांच्या पथकाने केली.

Next Post
जळगावातील शाहू महाराज रुग्णालयात ई.एस.आय.सी. योजनेअंतर्गत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध

जळगावातील शाहू महाराज रुग्णालयात ई.एस.आय.सी. योजनेअंतर्गत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध

ताज्या बातम्या

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
जळगाव जिल्हा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले
जळगाव जिल्हा

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध
जळगाव जिल्हा

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
जळगाव जिल्हा

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

August 24, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
गुन्हे

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add