• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर आता दर महिन्याला जळगावात उपलब्ध

पियुष हॉस्पिटल मध्ये ओपीडी सुरू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 17, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर आता दर महिन्याला जळगावात उपलब्ध

जळगाव, (प्रतिनिधी) : उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना त्यांच्या शहरातच अत्याधुनिक आणि तज्ज्ञ अस्थिरोग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकतर्फे जळगाव येथे नवीन ऑर्थोपेडिक परिघीय ओपीडी (Peripheral OPD) सुरू करण्यात येत आहे. या ओपीडीचे उद्घाटन सोमवारी पियुष हॉस्पिटल, रिंग रोड, जळगाव येथे संपन्न झाले. यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

या नव्या उपक्रमांतर्गत डॉ. सागर काकतकर, वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedic Surgeon), अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक हे दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत जळगाव येथे रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. या ओपीडीच्या माध्यमातून हाडांचे विकार, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, खांद्याचे आजार, कूल्हा व गुडघा प्रत्यारोपण (Joint Replacement), क्रीडाजन्य दुखापती तसेच विविध अस्थिरोगांवरील आधुनिक उपचारांविषयी रुग्णांना तज्ज्ञ सल्ला मिळणार आहे.

यावेळी बोलताना डॉ. सागर काकतकर म्हणाले, “आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे सांधे व हाडांशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेक रुग्ण वेदना सहन करत राहतात किंवा योग्य उपचार घेण्यास उशीर करतात. मात्र योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अनेक गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. जळगाव आणि परिसरातील रुग्णांना तज्ज्ञ सेवा मिळण्यासाठी नाशिकपर्यंत वारंवार प्रवास करावा लागू नये, यासाठी ही ओपीडी सुरू करण्यात आली आहे.” ते पुढे म्हणाले की, “अत्याधुनिक तंत्रज्ञान, मिनिमली इन्वेसिव्ह सर्जरी आणि सांधे प्रत्यारोपण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. योग्य रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळाल्यास त्यांचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारू शकते. या ओपीडीच्या माध्यमातून जळगाव आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार अस्थिरोग सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये डॉ. काकतकर यांनी आधुनिक अस्थिरोग उपचारपद्धती, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, क्रीडाजन्य दुखापतींचे उपचार तसेच रुग्णांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर माहिती दिली.

या प्रसंगी डॉ. काकतकर यांच्याकडून यशस्वी उपचार घेतलेल्या एका रुग्णाने आपला अनुभव उपस्थितांसमोर मांडला. उपचारानंतर झालेली आरोग्य सुधारणा, वेदनामुक्त जीवन आणि पुन्हा दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच डॉ. काकतकर आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की, “अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नेहमीच रुग्णांपर्यंत तज्ज्ञ आरोग्यसेवा पोहोचवण्यावर भर देत आले आहे. जळगाव येथे सुरू होणारी ही ऑर्थोपेडिक परिघीय ओपीडी त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. डॉ. सागर काकतकर यांच्यासारख्या अनुभवी अस्थिरोग तज्ज्ञांची सेवा आता जळगावकरांना स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. भविष्यातही उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना अधिकाधिक सुपरस्पेशालिटी सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”


 

Tags: #jalgaoncity
Next Post
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add