• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आरोग्य संवर्धनासाठी ‘जलनेती’चे महत्त्व; अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांचे प्रात्यक्षिक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 15, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
आरोग्य संवर्धनासाठी ‘जलनेती’चे महत्त्व; अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांचे प्रात्यक्षिक

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव खुर्द येथे प्रतिश्याय (नाक वाहणे, शिंक येणे, नाक बंद होणे) या समस्येवरील चर्चेदरम्यान योगशास्त्रातील उपयुक्त शुद्धीकरण क्रिया असलेल्या जलनेतीचे प्रात्यक्षिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी करून दाखविले.

यावेळी सहाय्यक प्राध्यापक डॉ. कोमल पाटील आणि योग प्रशिक्षक चैतन्य शिरसागर यांनी प्रतिश्याय, अ‍ॅलर्जिक राइनायटिस, सायनसच्या तक्रारी तसेच वारंवार होणार्‍या सर्दीमध्ये जलनेतीचे महत्त्व विशद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हर्षल बोरोले यांनी स्वतः जलनेतीची क्रिया करून विद्यार्थी व उपस्थितांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

मार्गदर्शन करताना डॉ. कोमल पाटील यांनी सांगितले की, जलनेतीमुळे नासामार्ग स्वच्छ राहण्यास मदत होवून प्रतिश्याय, अ‍ॅलर्जी आणि सायनसच्या तक्रारी कमी होण्यास सहाय्य मिळते. योग प्रशिक्षक चैतन्य शिरसागर यांनी जलनेती करण्याची योग्य पद्धत, आवश्यक खबरदारी आणि त्यानंतर करावयाच्या योगक्रियांची सविस्तर माहिती दिली. जलनेतीमुळे नाकातील धूळ, प्रदूषणाचे कण व अतिरिक्त कफ दूर होण्यास मदत होते. श्वसनक्रिया सुधारते, सायनससंबंधित त्रास कमी होतो तसेच मानसिक ताजेपणा आणि एकाग्रता वाढण्यासही सहाय्य मिळते, असे यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी डॉ. हर्षल बोरोले यांनी आयुर्वेद व योगशास्त्रातील दैनंदिन आरोग्य संवर्धनाच्या पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. निरोगी जीवनशैलीसाठी अशा शास्त्रोक्त क्रियांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयुर्वेद आणि योगशास्त्राच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.


 

Next Post
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

तापी-पूर्णा खोऱ्यातील 'अभ्यासू नेतृत्व' विधानपरिषदेत पोहोचणार !

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add