• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

शिबिरार्थींनी केले ‘श्यामची आई’ पुस्तकाचे वाचन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

जळगाव, (प्रतिनिधी) : मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय कमी होत असताना, वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ‘रोटरी वाचन कट्टा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विटनेर येथील डॉ. निलेश (जैन) ब्रह्मेचा माध्यमिक विद्यालय येथे झालेल्या या उपक्रमात ३८ शिबिरार्थींनी श्यामची आई या प्रेरणादायी पुस्तकाचे सामुहिक वाचन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एका शिबिरार्थ्याने साने गुरुजी यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने ‘श्यामची आई’ मधील एक परिच्छेद वाचून दाखवत पुस्तकातील संस्कार, प्रेम, त्याग आणि माणुसकीचे विचार अनुभवले.

यावेळी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. “वाचाल तर वाचाल” या उक्तीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. पुस्तके ही माणसाची खरी मित्र असून चांगले साहित्य विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य करते, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, अर्जुन प्रसाद, प्रशांत सुर्यवंशी, विक्रम अस्वार, मयूर गिरासे, चंद्रकांत चौधरी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी संकल्प चांगला माणूस बनण्याचा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. पुस्तकांद्वारे संस्कार आणि जीवनमूल्ये जपण्याचा संदेश उपक्रमातून देण्यात आला.

Tags: #Gandhiresearchfoundation
Next Post
जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add