• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 13, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी आय.एम.आर.तर्फे प्रगत संशोधन पद्धती, नैतिकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता – प्रकाशनापासून निधीपर्यंत या विषयावर पाच दिवसीय राष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असून कार्यशाळेत भारतभरातील तब्बल १३४२ प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ही कार्यशाळा ११ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

कार्यशाळेत ११ मे रोजी डॉ. ज्ञानेश्वर किरंगे, १२ मे रोजी डॉ. संदीप पाटील, १३ मे रोजी मुंबई येथील डॉ. नीता पाटील, १४ मे रोजी डॉ. प्रियंका बर्‍हाटे आणि १५ मे रोजी डॉ. हेमंत इंगळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेमध्ये एआय आधारित संशोधन साधनांचा प्रभावी वापर, प्लॅजिअरिझम टाळण्याचे उपाय, स्कोपस आणि युजीसी केअर जर्नल्समधील संशोधन प्रकाशन प्रक्रिया, संशोधन प्रस्ताव लेखन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन निधी योजनांविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.तसेच आधुनिक एआय संशोधन साधनांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात येणार आहे.

संशोधनामध्ये एआय चा नैतिक व जबाबदारीपूर्ण वापर, शैक्षणिक प्रामाणिकता आणि गुणवत्तापूर्ण संशोधन यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.यासोबतच संशोधन लेखनातील तांत्रिक बाबी, योग्य जर्नल निवड, संशोधन प्रकाशनातील गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक बाबी तसेच संशोधन निधी मिळविण्याच्या प्रक्रियेबाबतही सहभागी संशोधकांना मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील (अध्यक्ष गोदावरी फाउंडेशन, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच कॉन्व्हेनर डॉ. प्रशांत वारके (संचालक आयएमआर), समन्वयक प्रा. चारुशीला चौधरी, आयोजन समिती सदस्य डॉ. नीलिमा वारके, डॉ. चेतन सरोदे, प्रा. स्मिता चौधरी, प्रा. वैजयंती असोदेकर, अ‍ॅडव्हायझरी कमिटी सदस्य डॉ. पराग नारखेडे, डॉ. जी. के. पटनाईक, डॉ. मनोज बेहरे, डॉ. प्राजक्ता पाटील तसेच समन्वय समितीतील प्रा. पायल भंगाळे आणि प्रा. लीना पाटील यांनी परिश्रम घेतले आहेत.


 

Next Post
डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात ‘आरोहण २०२६’चा दिमाखदार समारोप

डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात 'आरोहण २०२६'चा दिमाखदार समारोप

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add