• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 6, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

​जळगाव, (प्रतिनिधी) : महाविद्यालयातील रॅगिंगसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केवळ कागदी घोडे न नाचवता, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग कमिटीने थेट विद्यार्थ्यांच्या गराड्यात जाऊन संवाद साधला. विशेष म्हणजे, ही औपचारिक बैठक कोणत्याही बंदिस्त हॉलमध्ये न होता चक्क महाविद्यालयाच्या ‘अन्नपूर्णाालयम’ या भोजनालयात पार पडली. कमिटीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

​विद्यार्थ्यांशी थेट संवाद आणि मार्गदर्शन..
​बुधवार, ६ मे रोजी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मेसमध्ये जेवणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कमिटीने रॅगिंगविरोधी कायद्यांची माहिती दिली. मेससारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना शिस्त कशी असावी आणि एकमेकांशी सौहार्दाचे वातावरण कसे राखावे, यावर मार्गदर्शन करण्यात आले.

​”विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही भीती राहू नये आणि त्यांनी मोकळेपणाने आपल्या अडचणी मांडाव्यात, हाच या मेसमध्ये घेतलेल्या बैठकीचा मुख्य उद्देश होता.” ​या प्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, नशिराबाद पोलीस विभागाचे अतुल महाजन, डॉ. प्रेमचंद पंडित, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, चेतन साखरे आणि ललित बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

​केवळ चर्चा न करता, कमिटी सदस्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून भोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या लहान-मोठ्या अडचणींवर डॉ. सोळंके यांनी संबंधित विभागांना तात्काळ सूचना देऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. प्रशासनाच्या या ‘फ्रेंडली’ दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, हा उपक्रम महाविद्यालयाचा एक यशस्वी आणि आदर्श पायंडा ठरला आहे.

Next Post
मद्यपी पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने आवळला गळा; जळगावमधील धक्कादायक घटना

मद्यपी पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने आवळला गळा; जळगावमधील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add