• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 16, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६,  JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये १६ ते २६ एप्रिल दरम्यान कांताई नगर जैन ड्रिम स्पेसेस मेहरूण तलावाजवळ रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य  रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सहा संघ मालक, प्रशिक्षक, खेळाडूंनी सहभाग घेतला.

काव्यवरत्नाली चौक येथून निघालेल्या रॅलीला हिरवी झेंडी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, दाल परिवारचे अतुल कोगटा, एस. के. ट्रान्सलाईनचे प्रणव कोठारी, सातपुडा आटोमोबाईलचे किरण बच्छाव, सुहांस केमिकल्सचे संदीप काबरा, एम. व्ही. जे. इंटस्ट्रीयल कन्सलन्टशी सीए महावीर जैन, विमल जैन, खलिल बनवट, सागर पार्क क्लबचे सर्व सहकारी, अनिल कांकरिया, जिल्हा क्रिकेट असोशिऐशनचे सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, ॲड. सुरज जहॉंगिर उपस्थित होते.

खेळाडू, प्रशिक्षक व संघ मालक यांनी मोटर सायकल रॅलीत सहभाग घेतला. ही रॅली काव्यरत्नावली चौक येथून निघून कलेक्टर बंगला मार्ग, मू. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वातंत्र चौक, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा काव्यरत्नावली चौक येथे पोहचली. याठिकाणी संघ मालक व मान्यवरांच्या हस्ते जर्सीचे अनावरण केले. जळगाव कोगटा किंग, पाचोरा एसकेटी योद्धाज, जामनेर सातपुडा हिरोज, चाळिसगाव एसपीसीसी चॅलेर्न्स, अमळनेर सुहांस जायंटस, रावेर रॉयल्स संघाचे टि शर्ट (जर्सी) अनावरण करण्यात आले.

आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा.. खेळाची ताकद दाखविण्याचा, जळगावची शान उंचाविण्याचा.. या टॅग लाईनच्या घोषणा उत्साहाने खेळाडूंनी दिल्यात. संघांचे फ्लॅग, प्रत्येक संघाचे टी शर्ट घालून सहभागी झालेले खेळाडूंनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. जळगाव क्रिकेट लिग-२०२६ या स्पर्धेमुळे शहरात क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भव्य रॅली यशस्वीतेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्यांसह रविंद्र धर्माधिकारी, समिर गुळवे, हितेंद्र पटेल, प्रशांत विरकर, वरुण देशपांडे, जगदीश चावला, मोहम्मद फजल,  उदय सोनवणे, युवाशक्तीचे विराज कावडिया यांच्यासह सहकारी यांनी सहकार्य केले.


 

Tags: #jainirigation#sportsJalgaon
Next Post
लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add