• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 9, 2026
in जळगाव जिल्हा
0
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

​जळगाव, (प्रतिनिधी) : एलपीजी गॅसची झालेली प्रचंड दरवाढ, कृत्रिम टंचाई आणि रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची जाचक नोंदणी फी यांविरुद्ध बुधवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा चालकांनी जोरदार निदर्शने केली. ‘ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य’ च्या वतीने पुकारलेल्या या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत जळगावात हे यशस्वी आंदोलन करण्यात आले.

​यावेळी मागण्यांचे लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांना देण्यात आले. मागण्यांचा योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले असले तरी, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यात बेमुदत बंद पुकारून ‘चक्का जाम’ केला जाईल, असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी दिला आहे.

​गॅस वितरकांकडून लूट: ५५ रुपयांचा गॅस १५० रुपयांना!
​आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा असल्याचे भासवून शहरातील एलपीजी वितरक रिक्षा चालकांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ५५ रुपये लिटर असलेला गॅस चक्क १२५ ते १५० रुपये दराने विकला जात आहे. अनेक पंप जाणीवपूर्वक बंद ठेवले जात असल्याने रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गैरप्रकाराबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे यांच्याशी चर्चा करून दोषी वितरकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

​कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींना विरोध..
​शासनाने स्थापन केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळा’च्या नोंदणी प्रक्रियेवरही संघटनांनी आक्षेप घेतला आहे. ५०० रुपये प्रवेश फी आणि ३०० रुपये वार्षिक फी रद्द करावी. तसेच मंडळाची नोंदणी केल्याशिवाय परमिट नूतनीकरण किंवा पासिंग केले जात नाही, ही आरटीओची सक्ती बेकायदेशीर असून ती त्वरित थांबवावी.

​प्रमुख संघटनांची एकजूट..
​हे आंदोलन प्रदेश अध्यक्ष शशांक राव आणि सरचिटणीस विलास भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. जळगावात प्रल्हाद सोनवणे, राजू मोरे, रज्जाक खान आणि प्रमोद वाणी यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात सुनील जाधव, राजू जयस्वाल, शांताराम अहिरे, ॲड. गोविंद तिवारी, देविदास भडंगर, सुरसिंग पाटील, जब्बार शेख, सय्यद सरताज, अमृत बारी, सुरेश वाघ, योगेश बाविस्कर, अशपाक शहा, जे. डी. भालेराव, राजेंद्र कोळी यांच्यासह शेकडो रिक्षा चालक व मालक उपस्थित होते.
​

Next Post
जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add