• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 9, 2026
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट फॅक्टरी, जैन ॲग्री पार्क तसेच जैन फूड पार्क येथील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी ‘विश्वनवकार महामंत्र दिन’ सामुहिकपणे मंत्र जपत उत्साहात संपन्न केला. सकाळी नियोजित वेळेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या विविध प्रकल्प परिसरात सामूहिक नवकार महामंत्र जप करण्यात आला. यामध्ये अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून भक्तिमय वातावरण निर्माण केले.

जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट, जैन ॲग्री पार्क तसेच जैन फूड पार्क येथे शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक जप करण्यात आला. यावेळी शांत, एकाग्र आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. सहभागी सर्वांनी सामूहिक प्रार्थना करीत अहिंसा आणि विश्वशांतीचा संकल्प घेतला. या नमस्कार महामंत्राद्वारे कोणत्याही व्यक्तीची पूजा न होता गुणसमुच्चयाची पूजा साधली जाते. ह्या योगे आपल्या विकारांवर विजय मिळवीत निर्विकार होण्याचा मार्ग प्रशस्त होतो. ही प्रार्थना केवळ जैन धर्मियांची नसून सर्व मानव जातीला मिळालेली शाश्वत देणगीच आहे.

सामूहिक जपामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचा अनुभव सहभागींकडून व्यक्त करण्यात आला. गेल्या वर्षापासून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)तर्फे संपूर्ण देशासह जगात ठिकठिकाणी विश्व नवकार महामंत्र प्रार्थनेचे आयोजन केले जाते.  जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात येते. गतवर्षी झालेल्या ‘विश्व नवकार महामंत्र सामूहिक जप’ उपक्रमात तब्बल ८१ हजार जणांनी विक्रमी सहभाग नोंदविला होता. यावर्षी सुद्धा अधिक संख्येने सहभाग नोंदविला गेला.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड्स लि. यांसारख्या उद्योग संस्थांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सर्वधर्मीय बांधवांना सहभागी करून वर्तमान परिस्थितीत विश्वशांतीचा संदेश देण्याचा आयोजकांचा मुख्य उद्देश होय. ‘नवकार महामंत्र दिना’च्या निमित्ताने जळगावात भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. आगामी ‘विश्व नवकार महामंत्र सामूहिक जप’ उपक्रमासाठीही या कार्यक्रमातून सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कंपनीतील विविध विभागांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

Next Post
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add