• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 27, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील खान्देशाची संस्कृती जपणाऱ्या ‘बहिणाबाई महोत्सवात’ राजकीय प्रोटोकॉल बाजूला सारून माणुसकीचे आणि साधेपणाचे एक आगळेवेगळे दर्शन घडले. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी व्हीआयपी आसन व्यवस्था उपलब्ध असतानाही, सामान्य महिला आणि बालकांसाठी आपली खुर्ची सोडून चक्क जमिनीवर मांडी ठोकली आणि कीर्तनाचा आनंद लुटला. त्यांच्या या कृतीने उपस्थित जळगावकरांची मने जिंकली.

बहिणाबाई महोत्सवाच्या सायंकाळच्या सत्रात आमदार राजूमामा भोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळा पार पडल्यानंतर दोंडाईचा येथील ह.भ.प. रविकिरण महाराज यांचे कीर्तन सुरू होणार होते. दरम्यानच्या काळात आमदार भोळे यांनी महोत्सवातील बचत गटांच्या प्रदर्शनाला व खाऊ गल्लीला भेट देऊन महिला उद्योजकांचा उत्साह वाढवला.

​आयोजकांची विनंती नाकारली..
भेट देऊन आमदार पुन्हा मुख्य व्यासपीठासमोरील व्हीआयपी कक्षात परतले. मात्र, त्याठिकाणी आधीच काही सामान्य महिला नागरिक आणि लहान मुले बसलेली होती. आपल्या लाडक्या आमदारांना जागा करून देण्यासाठी आयोजकांनी संबंधित महिलांना मागे बसण्याची विनंती केली. ही बाब राजूमामांच्या लक्षात येताच त्यांनी कोणालाही उठवण्यास सक्त मनाई केली. कोणताही बडेजाव न मिरवता त्यांनी लागलीच जमिनीवर मांडी घालून बसणे पसंत केले.

व्हीआयपी कक्षात बसलेल्या महिला भगिनींनी आमदार भोळे यांना विनंती केली की, “मामा, तुम्ही सोफ्यावर बसा.” मात्र, आपल्या पदाचा कोणताही अहंकार न बाळगता त्यांनी जमिनीवर बसूनच कीर्तन ऐकण्याचा आनंद घेतला. आमदारांचा हा साधेपणा पाहून दीपक सूर्यवंशी, आयोजक दीपक परदेशी, पवन जैन यांनी देखील त्यांच्या शेजारी जमिनीवर बसून कीर्तनाचा लाभ घेतला.

​लोकप्रतिनिधीने सामान्य जनतेशी नाळ कशी जोडून ठेवावी, याचा आदर्शच जणू या निमित्ताने पाहायला मिळाला. महोत्सवाला उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये आमदार राजूमामा भोळे यांच्या या विनयशील स्वभाव चर्चेचा विषय ठरला आहे.

Tags: #jalgaon_city#mlaRajumama#sureshbhole#आमदार

ताज्या बातम्या

आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर
खान्देश

आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर

January 27, 2026
‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’

January 27, 2026
बालविश्व शाळेच्या चिमुकल्यांनी मानवी साखळीतून साकारले ‘वंदे मातरम्’; प्रजासत्ताक दिनी अनोखी मानवंदना
खान्देश

बालविश्व शाळेच्या चिमुकल्यांनी मानवी साखळीतून साकारले ‘वंदे मातरम्’; प्रजासत्ताक दिनी अनोखी मानवंदना

January 26, 2026
‘बहिणाबाई महोत्सवा’त कर्तृत्वाचा गौरव; सत्यनारायण बाबा मौर्य यांच्या विचारांनी जळगावकर मंत्रमुग्ध
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवा’त कर्तृत्वाचा गौरव; सत्यनारायण बाबा मौर्य यांच्या विचारांनी जळगावकर मंत्रमुग्ध

January 26, 2026
जैन हिल्स येथील कृषीमहोत्सवाला मध्यप्रदेशचे हॉर्टिकल्चर मंत्री नारायन सिंह कुशवाह यांची भेट
कृषी

जैन हिल्स येथील कृषीमहोत्सवाला मध्यप्रदेशचे हॉर्टिकल्चर मंत्री नारायन सिंह कुशवाह यांची भेट

January 26, 2026
‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन

January 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group