• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 24, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल

जळगाव, (प्रतिनिधी) : तेली प्रदेश महिला मंडळ जळगाव आणि शारदा एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीनिमित्त तेली समाजातील महिला भगिनींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पांझरापोळ टाकीजवळील शाळा नंबर ३ मध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला जळगाव शहरातील असंख्य महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

​मैत्री आणि समाजवाढीचा संकल्प..
नेहमीच्या घरगुती आणि कामकाजाच्या व्यापातून महिलांना थोडा विरंगुळा मिळावा आणि समाजातील सर्व भगिनींनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करावी, या उदात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच त्यांच्यासाठी मजेशीर खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.

​मान्यवरांची उपस्थिती आणि नियोजन..
हा कार्यक्रम तेली समाज महिला महानगराध्यक्ष मनीषा प्रदीप चौधरी, निर्मला चौधरी व बेबाबाई सुरेश चौधरी यांच्या संकल्पनेतून साकार झाला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सुनंदा चौधरी, डॉ. सुषमा चौधरी आणि डॉ. सुजाता प्रदीप चौधरी यांनी केले.

​कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना विविध प्रकारची बक्षिसे आणि संक्रांतीचे पारंपारिक ‘वाण’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रिया चौधरी, आशा चौधरी, मेघा चौधरी, सारिका चौधरी, प्रतिभा चौधरी, अनिता चौधरी, कविता चौधरी, लताबाई चौधरी आणि उषा चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रशांत सुरडकर, प्रमोद चौधरी, विनोद चौधरी व उमेश चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


 

Tags: #jalgaon_city
Next Post
‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन

'बहिणाबाई महोत्सवा'त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add