• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात महायुतीचा विजयाचा संकल्प; ‘विकसित भारता’साठी एकत्र येण्याचे रवींद्र चव्हाणांचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 4, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगावात महायुतीचा विजयाचा संकल्प; ‘विकसित भारता’साठी एकत्र येण्याचे रवींद्र चव्हाणांचे आवाहन

जळगाव, (प्रतिनिधी) : “जळगावात महायुतीला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील यात शंका नाही. २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीचे नेते अहोरात्र प्रयत्न करत असून, या विकासाच्या प्रवासात जनतेची भक्कम साथ हवी आहे,” अशी साद भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घातली.

रविवारी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जळगावात आयोजित महायुतीच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार अमोल जावळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

​नगरसेवकांचा सत्कार आणि ‘वचननामा’ प्रकाशित..
​कार्यक्रमाच्या सुरुवातीला महायुतीकडून बिनविरोध निवडून आलेल्या १२ नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. जळगाव शहराच्या विकासाची दिशा स्पष्ट करणारा ‘महायुतीचा वचननामा’ देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

​बंडखोरीला लगाम; अपक्षांचा महायुतीला पाठिंबा
​या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अनेक अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना दिलेला जाहीर पाठिंबा. यामध्ये प्रामुख्याने:
​प्रिया विनोद तायडे (प्रभाग १३ ब – सुरेखा तायडे यांना पाठिंबा)
​शेख अहमद नूर (प्रभाग १० ड – जाकीर खान पठाण यांना पाठिंबा)
​नीलू संजय इंगळे (प्रभाग १० क – कविता शिवदे यांना पाठिंबा)
​विजय पाटील (प्रभाग ८ क – अमर जैन यांना पाठिंबा)
​मीनल हर्षल मावळे (प्रभाग १६ क – रंजना वानखेडे यांना पाठिंबा)
​राज कोळी (प्रभाग ९ ड – डॉ. चंद्रशेखर पाटील यांना पाठिंबा)
या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद शहरात अधिक वाढली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

​प्रचाराचा श्रीगणेशा
​मेळाव्यापूर्वी भवानी माता मंदिरात दर्शन घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. तसेच पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मेळाव्यात गुलाबराव देवकर, किशोर पाटील आणि गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल त्रिपाठी यांनी केले, तर आभार प्रदेश सरचिटणीस नितीन इंगळे यांनी मानले.


 

Tags: #jalgaon_city#politicalBjp
Next Post
जळगाव : प्रभाग १३ मध्ये महायुतीचा प्रचाराचा शंखनाद; ढोल-ताशांच्या गजरात रॅली

जळगाव : प्रभाग १३ मध्ये महायुतीचा प्रचाराचा शंखनाद; ढोल-ताशांच्या गजरात रॅली

ताज्या बातम्या

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 24, 2026
शेतीच्या वादातून कन्नडच्या व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; गोणीत मृतदेह भरून बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून कन्नडच्या व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; गोणीत मृतदेह भरून बहुळा नदीत फेकला

November 24, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 24, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; वर्षभरात दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगणार
जळगाव जिल्हा

बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; वर्षभरात दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगणार

November 24, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add