• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दिव्यांगाच्या कलाविष्काराने जळगावकर भारावले

बालरंगभूमी परिषदेचा विशेष मुलांचा महोत्सव ‘यहाँ के हम सिकंदर’

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 3, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
दिव्यांगाच्या कलाविष्काराने जळगावकर भारावले

जळगाव, (प्रतिनिधी) : दिव्यांग नसून दिव्य असणाऱ्या मुलांसाठी कार्य करणारे सर्वच शिक्षक महान आहेत. या मुलांसाठी ते घेत असलेल्या अपार मेहनतीला माझा सलाम. या मुलांसाठी मलाही काही करता आले तर त्यासाठी मी सदैव तयार आहे. बालरंगभूमी परिषद या विशेष मुलांसाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‌गार उद्योजक रजनीकांत कोठारी यांनी काढले. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित व जळगाव जिल्हा शाखा संयोजित दिव्यांग महोत्सव ‘यहाँ के हम सिकंदर’ या महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या ऑडिटोरियममध्ये बालरंगभूमी परिषदेचा हा विशेष मुलांच्या कलाविष्काराचा महोत्सव रंगला. यावेळी व्यासपीठावर उद्योजक रजनीकांत कोठारी, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक प्रविणकुमार सिंह, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगावचे सहाय्यक संचालक योगेश पाटील, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगावचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले.

या महोत्सवात जिल्ह्यातील १९ विद्यालयातील ३८० दिव्यांग बालकलावंतांनी सहभाग घेत, नृत्य – नाट्य – गायन – चित्रकला आदी कलांनी उपस्थित प्रेक्षकांना भारावून सोडले. समारोप प्रसंगी सहभागी प्रत्येक बालकलावंतांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे सहभागी विद्यालय व संस्थांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक विद्यालयातील ५ शिक्षकांचाही यावेळी बालरंगभूमी परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन उपाध्यक्षा नेहा पवार, कार्यकारिणी सदस्य मोहीत पाटील आकाश बाविस्कर, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे,सुरेखा मराठे अवधूत दलाल, संतोष चौधरी, हर्षल पवार, पंकज बारी आदींनी परिश्रम घेतले.


 

Tags: #jalgaon_city
Next Post
जळगाव मनपा रणसंग्राम: ‘प्रभागाचा विकास हेच ध्येय’; प्रभाग १२ मध्ये भाजप उमेदवारांचा घरोघरी संवाद

जळगाव मनपा रणसंग्राम: ‘प्रभागाचा विकास हेच ध्येय’; प्रभाग १२ मध्ये भाजप उमेदवारांचा घरोघरी संवाद

ताज्या बातम्या

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

November 6, 2026
जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

November 6, 2026
जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
खान्देश

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add