• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणांनी दैनंदिनीतून वेळ काढून आध्यात्मिक सेवा करावी : हभप रविकिरण महाराज

श्री दत्त जयंतीनिमित्त शिव कॉलनीत शिवनेरी ग्रुपतर्फे किर्तन सोहळ्याला प्रतिसाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 5, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, धार्मिक
0
तरुणांनी दैनंदिनीतून वेळ काढून आध्यात्मिक सेवा करावी : हभप रविकिरण महाराज

जळगाव (प्रतिनिधी) : तरुणाईने धावपळीच्या जीवनातदेखील देवांच्या, संतांच्या सानिध्यात राहिले पाहिजे. त्यामुळे आपले आध्यात्मिक व नैतिक उन्नयन होण्यास मदत होते. समाजात विविध क्षेत्रात काही ठिकाणी अधःपतन होताना आपल्याला दिसत आहे. मात्र तरी देखील आपल्या देव-देशाच्या सेवेसाठी आपण तत्पर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांनी केले.

शहरात शिव कॉलनी परिसरात चांदणी चौकातील मैदानामध्ये शिवनेरी ग्रुप तथा पंकज पाटील मित्र परिवारातर्फे दत्त जयंतीनिमित्त हभप रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांनी त्यांच्या खास विनोदी आणि ओघवत्या खान्देशी शैलीत कीर्तन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महाराजांनी आपल्या कीर्तनात विविध धार्मिक आणि अध्यात्मिक विषयांवर अत्यंत सोप्या भाषेत श्रोत्यांना मार्गदर्शन केले. रोजच्या जीवनातील उदाहरणे आणि खान्देशी भाषेतील सहज संवादामुळे, त्यांचे विचार थेट श्रोत्यांच्या मनाला भिडले.

यावेळी माजी महापौर सीमाताई भोळे, माजी नगरसेविका दीपमाला काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कीर्तनादरम्यान, महाराजांनी विनोदी पद्धतीने धार्मिक महत्त्व सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर भक्तिमार्ग आणि नीतिमत्तेचे महत्त्वही सांगितले. तरुणाईने व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या दैनंदिनी तून वेळ काढून अध्यात्मिक सेवा करावी असेही आवाहन ह.भ.प. रविकिरण महाराज यांनी केले. कार्यक्रमासाठी शिवनेरी ग्रुप व पंकज पाटील मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 

Next Post
हृदयद्रावक घटना! हाय-व्होल्टेज शॉकने बाप-लेकीचा मृत्यू; भाची गंभीर जखमी

हृदयद्रावक घटना! हाय-व्होल्टेज शॉकने बाप-लेकीचा मृत्यू; भाची गंभीर जखमी

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add