• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एरंडोल | विकासाच्या मुद्द्यावर आमदार अमोल पाटील यांची शहरात भव्य प्रचार रॅली!

'जनतेचा विश्वास, हित आणि विकास' ; एरंडोल मध्ये महायुतीचे प्रचार रणशिंग

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 30, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
एरंडोल | विकासाच्या मुद्द्यावर आमदार अमोल पाटील यांची शहरात भव्य प्रचार रॅली!

​एरंडोल, (प्रतिनिधी) : एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार अमोलदादा पाटील यांनी आज एरंडोल शहरात भव्य प्रचार रॅली काढत जनतेच्या भेटी-गाठी घेतल्या व शुभाशिर्वाद घेतले. त्यानंतर जाहीर सभेने उपस्थितांना संबोधित करत त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

​या प्रचार रॅलीत महायुतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र धुडकु ठाकुर, प्रभाग क्र. ४ अ चे उमेदवार कुणाल रमेश महाजन, प्रभाग क्र. ४ ब च्या उमेदवार सुनिता रूपेश माळी, प्रभाग क्र. ६ अ चे उमेदवार अनिल केशव महाजन आणि प्रभाग क्र. ६ ब च्या उमेदवार आरती योगेश देवरे हे सहभागी झाले होते.

​जनतेचा सहभाग हाच विकासाचा आधार..
​एरंडोलवासियांना संबोधित करताना आ. अमोलदादा पाटील म्हणाले, “आपल्या सर्वांच्या प्रेमाने, पाठबळाने आणि विश्वासाने आपण इथपर्यंतचा विकासाचा प्रवास एकत्र पार केला आहे. शहराच्या प्रगतीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी मजबूत पायाभरणी घालणे ही सर्वांसमोरची सामाईक जबाबदारी आहे.” रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, उद्योजकता आणि युवकांसाठी संधी यांसारखी सर्व क्षेत्रे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ​”विकास ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नसते. विकास घडतो तो केवळ जनतेच्या सहभागाने, प्रश्नांच्या योग्य अभ्यासाने आणि निर्णयक्षम नेतृत्वाने. माझ्या कामाचा केंद्रबिंदू नेहमीच ‘जनतेचा विश्वास, जनतेचे हित आणि जनतेचा विकास’ हाच राहिला आहे,” असे ठाम प्रतिपादन आ. अमोलदादा पाटील यांनी केले.

​पारदर्शकता आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन..
​नागरिकांनी व्यक्त केलेली अपेक्षा, मांडलेले प्रश्न आणि दिलेले आशीर्वाद प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. शहराची पुढील दिशा, प्रकल्पांचे प्राधान्यक्रम आणि अत्यावश्यक विषय लोकांच्या सल्ल्याने आणि सहभागानेच ठरवले जातील. पारदर्शकता, प्रामाणिकता, विकासाभिमुख कामकाज आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन या चार स्तंभांवर पुढील कामाचा पाया रचला जाईल, अशी ग्वाही लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र धुडकु ठाकुर यांनी यावेळी दिली.

​याप्रसंगी बाजार समिती माजी सभापती शालिक गायकवाड, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, रमेश परदेशी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, रूपेश महाजन, अनिल महाजन, माजी तालुकाप्रमुख बबलु पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, माजी नगरसेवक योगेश महाजन, नरेश ठाकरे, यांचेसह शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #politicalerandol
Next Post
बंद घर फोडून ६३ हजारांचा ऐवज लंपास; पिंप्राळा परिसरातील घटना

बंद घर फोडून ६३ हजारांचा ऐवज लंपास; पिंप्राळा परिसरातील घटना

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group