• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेर नगरपरिषदेत ‘महाजन’ पर्व!; ​नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड

गिरीश महाजनांचे निर्विवाद वर्चस्व कायम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 20, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जामनेर नगरपरिषदेत ‘महाजन’ पर्व!; ​नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड

​जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज (२० नोव्हेंबर, २०२५) माघारीच्या दिवशी एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड झाली. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासह भाजपचे सहा सदस्य देखील हे बिनविरोध निवडून आले आहेत.

​या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या प्रमुख विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही बिनविरोध निवड निश्चित झाली. जामनेर नगरपरिषदेच्या इतिहासात ही एक लक्षणीय घटना मानली जात आहे.

​मतदानापूर्वीच बिनविरोध विजय..
या निवडणुकीत साधना महाजन यांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात न राहिल्याने, मतदानाची प्रक्रिया होण्यापूर्वीच त्यांचा विजय निर्विवाद ठरला आहे. यामुळे जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.

​कार्यकर्त्यांचा जल्लोष..
बिनविरोध निवडीचे वृत्त कळताच महाजन समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी जामनेर शहरात मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ​साधना महाजन यांच्या निवडीमुळे आता जामनेर नगरपरिषदेच्या आगामी वाटचालीस नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Tags: #girishmahajan#politicalJamner
Next Post
जळगाव पोलिसांची धडक कारवाई: मुक्ताईनगरमध्ये २३ लाखांची गांजाची अवैध शेती उध्वस्त!

जळगाव पोलिसांची धडक कारवाई: मुक्ताईनगरमध्ये २३ लाखांची गांजाची अवैध शेती उध्वस्त!

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add