• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेर नगराध्यक्षपदाची निवडणूक: ‘शहर विकास आघाडी’ विरुद्ध ‘शिंदे गट’ थेट लढत; भाजप बॅकफूटवर!

नगरपालिकेला 'सलाईन' लावून संजीवनी देणार - डॉ. परीक्षित बाविस्कर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 20, 2025
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
अमळनेर नगराध्यक्षपदाची निवडणूक: ‘शहर विकास आघाडी’ विरुद्ध ‘शिंदे गट’ थेट लढत; भाजप बॅकफूटवर!

​अमळनेर, (प्रतिनिधी) : येथील आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा मोठी चुरस बघायला मिळत असून, ‘शहर विकास आघाडी’ विरुद्ध ‘शिवसेना (शिंदे गट)’ यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. सन्मानपूर्वक जागा न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून, याचा फटका ‘शहर विकास आघाडी’ला बसू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.


​डॉ. परीक्षित बाविस्कर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी; शिंदे गटात उत्साह
​तिकीट नाकारल्याने ऐनवेळी शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झालेले आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या उमेदवारीने शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ​माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यालयात शिवसेनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. बाविस्कर यांनी अमळनेर नगरपालिकेला ‘कर्जमुक्त’ करून शहराला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
​
‘आम्हाला ‘रबरी शिक्का’ नव्हे, तर उच्चशिक्षित उमेदवार हवा होता’ – शिरीष चौधरी
​माजी आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “काही लोकांना ‘कानाखालचा’ किंवा ‘रबरी शिक्का’ असा उमेदवार हवा होता, मात्र आम्ही एक उच्चशिक्षित आणि निष्कलंक उमेदवार उभा केला आहे. डॉ. परीक्षित बाविस्कर हे व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांनी आजवर लोकहिताचीच कामे केली आहेत. त्यामुळे मतदार त्यांनाच विजयी करतील, याची आम्हाला खात्री आहे.”


​‘नगर पालिकेला सलाईन लावून संजीवनी देणार’ – डॉ. परीक्षित बाविस्कर
​पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी महत्त्वाकांक्षी घोषणा केली. ते म्हणाले, “डॉक्टर असल्याने आजारी नगर पालिकेला सलाईन लावून संजीवनी देणार” असे ​त्यांनी अमळनेर नगरपालिकेच्या करोडो रुपयांच्या कर्जाच्या ओझ्यावर बोट ठेवत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने नगरपालिका कर्जमुक्त करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट केले. डॉ. बाविस्कर यांनी पुढील समस्या प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ​या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील, माजी नगरसेवक बबलू पाठक, पंकज चौधरी, तसेच शिवसेनेचे अन्य उमेदवार उपस्थित होते.
​


 

Tags: #politicalAmalner
Next Post
जामनेर नगरपरिषदेत ‘महाजन’ पर्व!; ​नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड

जामनेर नगरपरिषदेत 'महाजन' पर्व!; ​नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group