• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रथोत्सवात महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या ‘लेडीज गँग’ला अटक; ७७ हजारांचा ऐवज हस्तगत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 4, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रथोत्सवात महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या ‘लेडीज गँग’ला अटक; ७७ हजारांचा ऐवज हस्तगत

जळगाव, (प्रतिनिधी) : शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कामगिरी करत श्रीराम रथोत्सवाच्या कार्यक्रमात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऐवजही हस्तगत करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २ नोव्हेंबर रोजी दाणाबाजार परिसरातील अन्नदाता हनुमान मंदिराच्या जवळ श्रीराम रथ आल्याने दर्शनासाठी महिला व पुरुषांची मोठी गर्दी जमली होती. सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान, याच गर्दीचा फायदा घेऊन काही महिला आरोपींनी दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील सुमारे ७७ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या मंगळसूत्रातील वाट्या व मणी तोडून चोरी केली होती. या चोरीची तक्रार जळगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.

पोलिसांची तत्परता आणि यशस्वी कारवाई
चोरीची तक्रार येताच, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे व पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तत्काळ कारवाईला सुरुवात केली. या पथकांनी तातडीने तपासचक्रे फिरवून संशयित महिलांना ताब्यात घेतले आणि त्यांची संपूर्ण टोळी जेरबंद केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे रथोत्सवातील महिलांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश झाला आहे. या टोळीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती २०२३- प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पदस्थापना

जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती २०२३- प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पदस्थापना

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group