• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 2, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

जळगाव, (प्रतिनिधी) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले आहे. या दोन दिवसात अकादमीचे दोन स्कॉलर व दोन प्रतीथ यश कलावंतांचा सहभाग आहे.

पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंदनेने झाली. दीप प्रज्वलन आयटीसी संगीत अकादमीचे गुरु पं. ओंकार दादरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे सत्कार केले.

अकादमीच्या वतीने गुरु पं. ओंकार दादरकर यांनी रसिकांशी संवाद साधला. पहिल्या सत्रात अकादमीचा युवा कलाकार कौस्तव रॉय यांनी सरोद वादन सादर केले त्यांना तितकीच समर्थ तबल्याची साथ भोपाळ येथील रामेंद्र सिंह सोळंकी यांनी केली. कौस्तव यांनी राग श्री मध्ये जोड आणि झाला सादर करून रसिकांना रीजविले. त्यानंतर धमार व अध्दा तालात निबद्ध रचना सादर केल्या आणि रसिकांची वाहवा मिळाली.

दुसऱ्या सत्रात अकादमीचे गुरु पंडित ओंकार दादरकर यांनी विलंबित झुमरा तालात मारुबिहाग रागातील बडा ख्याल “जागे मेरे भाग” सादर केले, त्यानंतर “पारी मोरी नाव” ही दृत एकतालातील बंदिश सादर केली. त्यानंतर विदुषी गिरीजादेवी यांनी स्वरबद्ध केलेला दादरा सादर केला हा दादरा मिश्र किरवाणी रागामध्ये निबंध होता “तुम बिन गाईन” सादर केला.

त्यानंतर विदुषी माणिक वर्मा ज्या ओंकारच्या आत्या आहेत त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांनी गाऊन आजरामर केलेलं “अमृताहुनी गोड नाम तुझे देवा” हे भजन व संगीत कान्होपात्रा या नाटकातील अजरामर भैरवी “अगं वैकुंठीचे राया” गाऊन आपल्या मैफीलीची सांगता केली. ओंकार यांना तबल्यावर युवा तरुण आश्वासक तबलावादक तेजोवृष जोशी तर संवाद युनिवर अनंत जोशी यांनी अप्रतिम साथ सांगत केली.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनघा नाईक गोडबोले यांनी केले. या महोत्सवाच्या आज दुसरा दिवस असून यामध्ये प्रथम सत्रात नुपूर चांदोरकर खटावकर व आर्या शेंदुर्णीकर हे दोन कलावंत गुरुवंदना व कथक नृत्याचा आविष्कार सादर करणार आहेत. द्वितीय सत्रात अनुभव खामरू ह्या अकादमीच्या स्कॉलरचे शास्त्रीय गायन सादर होईल. तृतीय व समारोपाच्या सत्रात पं. रूपक कुलकर्णी यांच्या बासरी वादन सादर होईल. या कार्यक्रमास जळगावकर रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन संगीत रिसर्च अकादमी व प्रतिष्ठानने केले आहे.


Next Post
जळगावात ‘प्रगतीशिल महाराष्ट्र २०२५’ भव्य प्रदर्शन: विकास योजनांची माहिती एकाच छताखाली!

जळगावात ‘प्रगतीशिल महाराष्ट्र २०२५’ भव्य प्रदर्शन: विकास योजनांची माहिती एकाच छताखाली!

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group