• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोलिसांची मोठी कारवाई : जुगार अड्ड्यावर छापा, १६ आरोपी ताब्यात, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 8, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पोलिसांची मोठी कारवाई : जुगार अड्ड्यावर छापा, १६ आरोपी ताब्यात, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पाळधी येथे सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर यशस्वी छापा टाकत १६ आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात रोख रक्कम आणि महागड्या मोबाईल फोनचा समावेश आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आज, सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी पाळधी येथील शाम कॉलनीमध्ये एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले.

पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, छापा टाकून घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्याला घेरले. या छाप्यात पोलिसांनी १६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७,२२,२६० रुपये रोख रक्कम आणि ५,०२,००० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण १२,२४,२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सर्व आरोपींविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव परिमंडळ आण्णासाहेब घोलप, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. शरद बागल, पोहेकों अक्रम शेख, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, नितीन बावीस्कर, सलीम तडवी, विनोद पाटील, विजय पाटील, रंविंद्र चौधरी, रविंद्र कापडने, सिध्देश्वर डापकर, राहुल रगडे, रतन गिते, मयुर निकम, भारत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकुर, पाळधी दुरक्षेत्राचे सपोनि. प्रशांत कंडारे, अमोल धोबी, पोकॉ रविंद्र चौधरी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पाळधी दूरक्षेत्रातील पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई यशस्वी केली.

Tags: Crime
Next Post
स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी जैन इरिगेशनच्या ४४५ कर्मचाऱ्यांचे रक्तदान

स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी जैन इरिगेशनच्या ४४५ कर्मचाऱ्यांचे रक्तदान

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group