• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फत्तेपुर आणि तोंडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे व शिवसृष्टीचे लोकार्पण

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विशेष उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
फत्तेपुर आणि तोंडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे व शिवसृष्टीचे लोकार्पण

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आणि शिवसृष्टीचे लोकार्पण रविवारी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन,खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जे. के. चव्हाण, संजय गरुड, प्रा. शरद पाटील, डॉ. प्रशांत भोंडे, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे, तहसीलदार नानासाहेब आगळे यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ युद्धाचा नसून तो लोककल्याण, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि धर्मनिरपेक्षतेचा आहे. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केवळ तलवारीच्या बळावर केली नाही, तर प्रजेला न्याय, सुरक्षा आणि स्वाभिमान दिला. आजच्या तरुण पिढीनेही त्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केले पाहिजे. या शिवसृष्टीतून भावी पिढीला इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन होईल. शालेय विद्यार्थी, तरुण, नागरिकांनी येथे येऊन महाराजांचा संघर्ष, शौर्य आणि दूरदृष्टी यांचा अभ्यास करावा.”

यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. निर्व्यसनी राहून आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. एकजुटीने समाजाच्या सेवेत राहावे.” तसेच, “जामनेर तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून गावागावात प्रेरणा पोहोचवण्याचे कार्य पुढेही सुरू राहील,” असेही त्यांनी सांगितले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जामनेर आगमनावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर तोंडापूर येथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीचे लोकार्पण केले. कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, नागरिक, शिवप्रेमी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 

Next Post
धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई: ४० किलो गांजा जप्त, कारसह २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई: ४० किलो गांजा जप्त, कारसह २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add