• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दुर्बिणीद्वारे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 11, 2025
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दुर्बिणीद्वारे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव, (जिमाका) : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी, जळगाव येथे दिनांक ९ जुलै ला दोन अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे यशस्वीपणे पार पडल्या. या शस्त्रक्रियांचे नेतृत्व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील (सामान्य रुग्णालय जळगाव) व वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे (जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

पहिल्या शस्त्रक्रियेमध्ये दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाचे आधी दोन सिझर झाले होते आणि गर्भपिशवी मूत्रपिंड व इतर अवयवांशी चिकटली होती. अशा परिस्थितीत मोठ्या जोखमीची ही शस्त्रक्रिया डॉ. रोहन पाटील (एम.एस. सर्जरी, पियुष हॉस्पिटल) व डॉ. चंदन महाजन (एम.डी., हर्षगोप हॉस्पिटल) यांनी अत्यंत कुशलतेने व यशस्वीरीत्या पार पाडली.

तर दुसऱ्या शस्त्रक्रियेत स्त्रीच्या गर्भाशयाजवळील ९x७ सेंमी गाठ जी आजूबाजूच्या अवयवांना चिकटली होती, ती डॉ. रोहन पाटील यांनी यशस्वीरीत्या काढून टाकली. या दोन्ही शस्त्रक्रियांना डॉ. नरेंद्र ठाकूर (एम.डी. अ‍ॅनेस्थेसिया), डॉ. सुनील तायडे व डॉ. किरण सोनवणे यांनी योग्य ती भूल देऊन अतिशय सुरक्षिततेने पार पाडण्यात मदत केली. या शस्त्रक्रियेमध्ये संगीता शिंगारे (अधिसेविका), वैशाली पाटील (शस्त्रक्रिया परिसेविका), तुळसा माळी व नम्रता नागापुरे (अधिपरिचारीका), तसेच शस्त्रक्रिया विभागातील कक्षसेवक व सर्व सहकारी कर्मचारी यांनीही यशस्वी अंमलबजावणीत मोलाची भूमिका बजावली.

या रुग्णालयात आतापर्यंत ३० हून अधिक लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या आहेत. यामध्ये गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स, हर्निया दुरुस्ती अशा शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात येतात. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. किरण पाटील व डॉ. किरण सोनवणे यांनी केले आहे.

Next Post
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group