• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खेळता खेळता काळाचा घाला! जळगावात १३ वर्षीय शाळकरी मुलाचा दोरीच्या फासाने मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
खेळता खेळता काळाचा घाला! जळगावात १३ वर्षीय शाळकरी मुलाचा दोरीच्या फासाने मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील मुंदडा नगर परिसरात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. खेळता खेळता दोरीचा फास लागून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अहिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हार्दिक प्रदीपकुमार अहिरे (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. हार्दिक हा सातवी इयत्तेत शिकत होता. त्याचे वडील प्रदीपकुमार अहिरे हे रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील माध्यमिक शाळेत शिक्षक असून, आई गृहिणी आहेत. सोमवारी शाळेला अर्धी सुट्टी असल्याने हार्दिक दुपारी ३ वाजता घरी आला होता. जेवण झाल्यावर त्याने बाहेर खेळण्यासाठी आईकडे आग्रह धरला, मात्र पाऊस असल्याने आईने त्याला बाहेर जाण्यास मनाई केली होती.
सायंकाळी ४.४५ च्या सुमारास हार्दिकची आई धाकट्या मुलाला घेऊन बाहेर गेली असताना, हार्दिक घराशेजारील पद्मसिंह परदेशी यांच्या घरी खेळायला गेला. परदेशी यांच्या घराच्या पोर्चमध्ये प्रशिक्षणासाठी एक दोरी बांधलेली होती. हार्दिक त्याच दोरीजवळ खेळत असताना, त्याला अचानक त्या दोरीचा फास लागला आणि ही दुर्घटना घडली.

पद्मसिंह परदेशी यांच्या पत्नी घरात असताना, त्यांना अचानक आवाज ऐकू आला. त्या धावत आल्या असता, त्यांना हार्दिक दोरीला फास लागलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तात्काळ हार्दिकच्या आईला बोलावले. कुटुंबातील सदस्यांनी तातडीने हार्दिकला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. त्यानंतर, हार्दिकचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेने अहिरे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रामानंदनगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Next Post
महावितरण कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू: प्रलंबित बदल्यांविरोधात कामगार महासंघ आक्रमक

महावितरण कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू: प्रलंबित बदल्यांविरोधात कामगार महासंघ आक्रमक

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add