जळगांव, दि.13 – तालुक्यातील नांद्रा बु. येथे प्रा.भाऊसाहेब सोनवणे युवा ग्रुप आणि गोदावरी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोफत आरोग्य शिबीरचे आयोजन करण्यात आले. दरम्यान शिबिरात साधारण ५०० च्या वर रुग्णांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला.
यात शुगर तपासणी, ईसीजी, सोनोग्राफी जागेवरच करण्यात आली. तसेच शिबीरात नेत्र रोग, हाडांची तपासणी, कान, नाक, घसा, दारूमुळे झालेले लिव्हरचे नुकसान, पोटातील आजार, छातीचे आजार, गर्भपिशवी संदर्भातील तक्रार असलेल्या रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी समाधान पाटील, पंकज कोळी, सुरेश पाटील, कैलास पाटील, किरण पाटील, सुनील सोनवणे, चंद्रभान पवार, संजय बडगुजर, अशोक पाटील, छोटू सरकार, कमलाकर सपकाळे तसेच भाऊसाहेब युवा ग्रुपचे सहकारी यांनी सहकार्य केले.








