• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात खिसे कापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 26, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात खिसे कापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त!

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी खिसे कापून पैसे चोरण्याच्या वाढत्या घटनांवरून नागरिक हैराण झाले होते. या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आंतरराज्य खिसे कापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत, तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ५.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी या टोळीला पकडण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, पोलीस नाईक किशोर पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

दिनांक २५ जून, २०२५ रोजी, पोलीस हवालदार प्रवीण भालेराव आणि अक्रम शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की, अमरावती येथील काही रेकॉर्डवरील खिसे कापणारे गुन्हेगार जळगाव बस स्थानकात आले आहेत. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी बस स्थानक परिसरात गस्त वाढवली. त्यावेळी, तीन संशयित व्यक्ती गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या इराद्याने फिरताना दिसल्या.

पोलिसांनी या तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी आणले. चौकशीदरम्यान, त्यांनी आपली नावे अहमद बेग कादर बेग (वय ६२, रा. मुजफ्फरपुरा, नागपुरी गेट, अमरावती), हफिज शाह हबीब शाह (वय ४९, रा. बलगाव सकीनगर, अमरावती) आणि अजहर हुसैन हफर हुसेन (वय ४९, रा. सुपिया मस्जिद समोर, रहमत नगर, अमरावती) अशी सांगितली.

त्यांनी २४ जून, २०२५ रोजी जळगाव बस स्थानकात एका प्रवाशाच्या खिशातून १०० रुपयांच्या दोन नोटांचे बंडल चोरी केल्याचे कबूल केले. आरोपींची आणि त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता, त्यांच्याकडून रोख ३३,८३० रुपये, १७,५०० रुपये किमतीचे ५ मोबाईल, १ रेक्झीन बॅग आणि ५,००,००० रुपये किमतीची १ टाटा इंडिका व्हिस्टा कार असा एकूण ५,५१,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी अहमद बेग कादर बेग याच्याविरुद्ध अमरावती शहरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही ४ गुन्हे दाखल आहेत.

 


Next Post
डॉ. स्नेहल रावते मृत्यू प्रकरण: फॉरेन्सिक मदतीने डंपर चालक अटकेत!

डॉ. स्नेहल रावते मृत्यू प्रकरण: फॉरेन्सिक मदतीने डंपर चालक अटकेत!

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group