जळगाव, (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालया मध्ये शैक्षणिक दिनदर्शिका २०२५-२६ चे प्रकाशन केंद्र क्रमांक ६ च्या केंद्रप्रमुख तृप्ती बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक दिनदर्शिका ही एक अशी चौकट आहे ज्याद्वारे शाळेचे दैनंदिन कामाचा एक महत्त्वाचा भाग चालवणाऱ्या महत्त्वाच्या तारखा दर्शविल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांना व पालकांना शैक्षणिक वर्ष आणि सत्र २०२५-२६ च्या सत्रातील प्रमुख उपक्रमाबद्दल माहिती दिलेली आहे.
या शैक्षणिक दिनदर्शिकेत वार्षिक उपक्रम अभ्यासाचे मासिक नियोजन असल्याने विद्यार्थ्यांना, शिक्षकांना शैक्षणिक दिनदर्शिका अभ्यासाचे व उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
संस्थेच्या शैक्षणिक वाढीवर आणि शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यावर मोठा परिणाम होईल. शैक्षणिक दिनदर्शिकेमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विभागांसह वर्गांचे वेळापत्रक तयार करणे आणि वेळापत्रक तयार करणे सोपे झाले आहे, असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.








