• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दहावी-बारावीच्या १,२०७ विद्यार्थ्यांची परीक्षा २४ जूनपासून

नियोजनाचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 24, 2025
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
दहावी-बारावीच्या १,२०७ विद्यार्थ्यांची परीक्षा २४ जूनपासून

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (दहावी व बारावी) जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते त्या विद्यार्थ्यांची जून-जुलै २०२५ या कालावधीत होणार असून परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी सोमवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक झाली, त्यात त्यांनी परीक्षेच्या नियोजनाचा आढावा घेतला.

या बैठकीत शिक्षणाधिकारी यांनी परीक्षा केंद्रांची संख्या, विद्यार्थी संख्येचा आढावा तसेच कायदा-सुव्यवस्था व कॉपीमुक्त अभियानाच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. यंदा इयत्ता दहावीच्या १४ परीक्षा केंद्रांवर ६९८ विद्यार्थी परीक्षा देणार असून, ८ परिरक्षक केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इयत्ता बारावीच्या ८ परीक्षा केंद्रांवर ५०९ विद्यार्थी उपस्थित राहणार असून, ८ परिरक्षक केंद्रे कार्यरत असतील. अशा प्रकारे एकूण २२ परीक्षा केंद्रांवर १६ परिरक्षक केंद्रांच्या माध्यमातून १,२०७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

यावेळी कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखणे, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवणे, तसेच कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन, पोलीस व शिक्षण विभाग यांच्यात समन्वयाने कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या असून, आत्मविश्वासाने व संयमाने परीक्षा द्यावी असे आवाहनही केले आहे.

 


 

Tags: #educational#jalgaon_city
Next Post
माहिती अधिकार कायद्याच्या २० वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त जळगावात कार्यशाळा!

माहिती अधिकार कायद्याच्या २० वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त जळगावात कार्यशाळा!

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add