• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मन प्रसन्न करणारी सानिका भन्साळी यांची चित्रे: अशोक जैन यांच्या हस्ते प्रदर्शन उद्घाटन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
मन प्रसन्न करणारी सानिका भन्साळी यांची चित्रे: अशोक जैन यांच्या हस्ते प्रदर्शन उद्घाटन

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रिंगरोडवरील आर्ट गॅलरीमध्ये सानिका भन्साळी यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. सानिकाची चित्रे मनाला प्रसन्न करणारी असून त्यामध्ये भाव, रंग आणि रेषांचे वैशिष्ट्य दिसून येते, असे मत अशोक जैन यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी व परिवर्तन अध्यक्ष शंभू पाटील, अनिल कांकरिया, किड्स ग्रुपच्या प्रिन्सिपल मीनल जैन, चित्रकार सचिन मुसळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शंभू पाटील यांनी सानिकाच्या प्रदर्शनाला “नव्या पिढीच्या मनात असलेल्या भावभावनांचे प्रदर्शन” असे संबोधले. सानिकाने वापरलेले रंग आणि शोधलेले आकार तिच्यातील उत्तम कलावंताची ओळख करून देतात, असेही ते म्हणाले.

किड्स ग्रुपच्या प्रिन्सिपल मीनल जैन यांनी सानिकाच्या लहानपणापासूनच्या चित्रकलेच्या गुणांबद्दल अभिमान व्यक्त केला आणि इतके चांगले प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सानिकाचे आजोबा विजयकुमार भन्साळी यांनी तिच्या कलेच्या आवडीची सुरुवात घरातील भिंतीवरील चित्रांपासून झाल्याचे सांगितले. उद्योजक अनिल कांकरिया यांनी जळगाव ही अभिनव व कल्पक कलावंतांची भूमी बनत असून असे नवे कलावंत आकाराला येणे हे शहर सुंदर बनत असल्याचे लक्षण असल्याचे मत व्यक्त केले.

या उद्घाटनप्रसंगी चित्रकलेवर प्रेम करणारे अनेक कलावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन चित्रकार सानिका भन्साळी यांनी केले. हे चित्र प्रदर्शन ३० जूनपर्यंत पुना रिंगरोडवरील आर्ट गॅलरीमध्ये असणार असून, चित्रप्रेमींनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव भन्साळी आणि नेहा भन्साळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Next Post
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुणे घाटात ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुणे घाटात ऑरेंज अलर्ट

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add