• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शालकाने चक्क मेव्हण्यालाच लुबाडले; ३ कोटींची केली फसवणूक..!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
शालकाने चक्क मेव्हण्यालाच लुबाडले; ३ कोटींची केली फसवणूक..!

जळगाव, (प्रतिनिधी) : व्यवसायासाठी थोडे-थोडे करून घेतलेले तब्बल चार किलो सोने परत न देता सराफ व्यापाऱ्याची ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना सन २००८ ते २०१४ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी सराफ यांचे शालक अमित दिलीप सोनार (वय ४५, रा. सिंधी कॉलनी, नंदुरबार) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्ण व्यावसायिक , सुनील दिनानाथ सराफ (वय ५५, रा. स्वामी समर्थ केंद्राजवळ) यांचे जळगावातील सराफ बाजार परिसरात दुकान आहे. त्यांचा शालक अमित सोनार याने त्यांचा विश्वास संपादन केला. नंदुरबार येथील आपल्या दुकानावर दागिने बनवण्यासाठी त्याने सुनील सराफ यांच्याकडून थोडे-थोडे सोने घेतले. सन २००८ ते २०१४ या सहा वर्षांच्या कालावधीत, अमितने ६० ग्रॅम ते २५० ग्रॅम या प्रमाणात असे एकूण चार किलो सोने घेतले. या सोन्यातून त्याने दागिने बनवून ते स्वतःच्या व्यवसायासाठी वापरले. मात्र, सराफ यांना पैसे किंवा सोने परत देण्याबाबत टाळाटाळ करत त्याने ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.

तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने घेऊनही ते परत मिळत नसल्याने, सुनील सराफ यांनी अखेर शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अमित सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोने परत मिळत नसल्याने सराफ हे वारंवार सोने मागण्यासाठी गेले असता, त्यांना शिवीगाळ करण्यासह दमदाटीही करण्यात यायची, असे सराफ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत.


 

Next Post
मन प्रसन्न करणारी सानिका भन्साळी यांची चित्रे: अशोक जैन यांच्या हस्ते प्रदर्शन उद्घाटन

मन प्रसन्न करणारी सानिका भन्साळी यांची चित्रे: अशोक जैन यांच्या हस्ते प्रदर्शन उद्घाटन

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add