जळगाव, (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड माॅं के नाम अभियानांतर्गत शाळेच्या परिसरात पहिल्याच दिवशी २० झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. शाळेच्या लोकसहभागातून वृक्षारोपण आवाहनाला जळगाव शहर महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त गणेश चाटे यांनी शाळेला २० प्लास्टिक टाकी दिल्या. व प्रचिती मीडिया चे संचालक सचिन घुगे यांनी २० वृक्ष देत या अभियानाला भरभरून साथ दिली.
मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश फड, प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे, संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक, इंजि हेमंत नाईक यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून ‘एक पेड माँ के नाम अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वृक्षारोपण करीत अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मागील वर्षाची इको क्लब ची कार्य सांगितले. आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक तरी झाड दान करा असे आव्हान शाळेतील पालकांना व परिसरातील नागरिकांना केले.