• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कजगाव रेल्वे स्थानकावर बडनेरा-नाशिकरोड गाडीला अखेर थांबा

ग्रामस्थांनी खासदारांसमोर वाचला समस्यांचा पाढा!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 12, 2025
in जळगाव जिल्हा
0
कजगाव रेल्वे स्थानकावर बडनेरा-नाशिकरोड गाडीला अखेर थांबा

भडगाव, (प्रतिनिधी) : तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कजगाव रेल्वे स्थानकावर बडनेरा-नाशिकरोड एक्स्प्रेसला अखेर थांबा मिळाला आहे. गुरुवार, ११ जून रोजी, या गाडीच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी खासदार स्मिता वाघ, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या चार महिन्यांपासून या गाडीला थांबा जाहीर झाला होता, परंतु प्रत्यक्षात ती थांबत नसल्याने स्थानिकांमध्ये मोठी नाराजी होती. अखेर ११ जूनपासून गाडीला प्रत्यक्ष थांबा मिळाल्याने कजगाव आणि पंचक्रोशीतील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे कजगाव परिसरातील शेकडो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

यावेळी खासदार स्मिता वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, रेल्वेचे डिव्हिजन मॅनेजर भानुदास तपस्वी, ऑपरेटिंग मॅनेजर शंभू शरणसिंग, स्टेशन अधीक्षक बी.एस. मीना, कमर्शियल इन्स्पेक्टर चंद्रकांत काळे, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, भाजपाचे अमोल पाटील, मधुकर काटे, शिवसेनेचे अनिल महाजन, समाधान पाटील, गोंडगावचे सरपंच राहुल पाटील, भोरटेकचे उपसरपंच उमेश देशमुख, नंदू सोमवंशी, योगेश सूर्यवंशी तसेच कजगाव, गोंडगाव, भोरटेक, निंभोरा, कनाशी, खाजोळा, पिंपरी, पासर्डी, कोठली, गुढे, तांदुळवाडी, मळगाव आणि परिसरातील असंख्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदारांसमोर नागरिकांनी मांडल्या समस्या..
रेल्वेच्या विशेष कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच कजगाव येथे आलेल्या खासदार स्मिता वाघ यांच्यासमोर कजगाव आणि परिसरातील ग्रामस्थांनी समस्या मांडल्या. यामध्ये रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांना दुसऱ्या बाजूला ये-जा करण्यासाठी येणारी अडचण, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रेल्वे रहदारीमुळे होणारी गैरसोय, चुकीच्या ठिकाणी लावलेली तिकीट खिडकी, कजगावच्या जुन्या हायस्कूलजवळील पुलाखाली साचणारे पाणी, भोरटेकच्या बोगद्याची अडचण अशा अनेक समस्या नागरिकांनी खासदारांसमोर मांडल्या. खा. स्मिता वाघ यांनी सर्वांच्या अडचणी समजून घेतल्या आणि येत्या आठ दिवसांत त्यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले. यावेळी गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Next Post
धक्कादायक: जळगावमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरी आत्महत्या

धक्कादायक: जळगावमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरी आत्महत्या

ताज्या बातम्या

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!
जळगाव जिल्हा

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

June 20, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन
आरोग्य

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

June 20, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन
जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन

June 20, 2026
विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित
जळगाव जिल्हा

विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

June 20, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

June 19, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

June 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group