• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भीषण अपघातात शिवसेना नेत्याच्या पतीसह दीराचा मृत्यू : जळगावात हळहळ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
भीषण अपघातात शिवसेना नेत्याच्या पतीसह दीराचा मृत्यू : जळगावात हळहळ

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहराला आज बुधवारी पहाटे भीषण अपघाताने हादरवून सोडले. निमखेडी शिवारात पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास एका अवजड वाहनाने रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांमध्ये शिवसेना (शिंदे गट) महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि दीर प्रमोद दगडू शिवदे यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर आणि प्रमोद हे दोघेही पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. दररोजप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर येथील जुन्या घरी जात असताना, निमखेडी येथील कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2025/06/VID-20250604-WA0033.mp4

अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. मयतांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. या दुःखद घटनेची माहिती मिळताच, त्यांच्या नातेवाईकांसह शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी आणि विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. रुग्णालयात प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला.

जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस धडक देणाऱ्या वाहनाचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. एकाच अपघातात दोन सख्ख्या भावांचा अकाली मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: accident
Next Post
रावेर घाटात मालवाहू टेम्पो उलटला : १ ठार, २२ मजूर जखमी

रावेर घाटात मालवाहू टेम्पो उलटला : १ ठार, २२ मजूर जखमी

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add