• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुर्दैवी! अमळनेर तालुक्यात विहिरीत पडून १५ वर्षीय बालिकेचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 30, 2025
in जळगाव जिल्हा
0
दुर्दैवी! अमळनेर तालुक्यात विहिरीत पडून १५ वर्षीय बालिकेचा मृत्यू

अमळनेर, (प्रतिनिधी) : विहिरीजवळ तोल गेल्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २७ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नगाव शिवारातील शेतात घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देवयानी संदीप पाटील (वय १५ रा. धुपी ता. अमळनेर) असे मयत मुलीचे नाव आहे. तालुक्यातील धुपी गावात देवयानी पाटील ही मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी दि.२७ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नगाव शिवारातील शेत गट क्रमांक ७/१ मधील भाग्यश्री पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत देवयानी पाटील ही तोल जावून पडल्याने तिचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने देवयानीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

त्यानंतर अमळनेर ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी देवयानीचे काका रावसाहेब लोटन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे धुपी गावात शोककळा पसरली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.

Next Post
अनैतिक संबंधातून पत्नीचा खून : सैन्यदलातील क्लार्क पतीसह चौघे अटकेत

अनैतिक संबंधातून पत्नीचा खून : सैन्यदलातील क्लार्क पतीसह चौघे अटकेत

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add