• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी.. – अशोक जैन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 30, 2025
in जळगाव जिल्हा
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी.. – अशोक जैन

जळगाव, (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अत्यंत सुशासन, न्यायप्रियता, सामाजिक समता, आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आधुनिक भारतात आदर्श ठरावी अशी आहे. त्यांच्या विचारातून समाजाला दिशा मिळते, असे मत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने ३० मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या “३०० किमी – ३०० वाहनांच्या भव्य रॅली” संदर्भात सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी अशोक जैन यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी अशोकभाऊ जैन बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर यांचे शासनकार्य हे केवळ कारभार नव्हे तर लोकसेवेचे उत्कृष्ट उदाहरण होते. त्यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या गरजांचा विचार करून विकासाची दिशा ठरवली. रस्ते, धर्मशाळा, घाट, मंदिर, जलव्यवस्था, शिक्षणसंस्था यांचे बांधकाम करून त्या काळातच त्यांनी सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण घालून दिले. स्त्रीशक्तीचा आदर्श कसा असावा, हे त्यांच्याकडून शिकावे लागेल.”

अहिल्यादेवींचे ज्ञानदान आणि शैक्षणिक दृष्टिकोन आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी अनेक तत्त्वज्ञ आणि धर्माचार्यांशी संवाद साधून समाजाला ज्ञानप्रद मार्गदर्शन केले. त्यांनी लोककल्याणार्थ धर्म व अध्यात्माचा उपयोग करून सामाजिक स्थैर्य निर्माण केले. “आजच्या युवा पिढीने अहिल्यादेवींप्रमाणे समाजासाठी झोकून देण्याची प्रेरणा घ्यावी. त्यांच्या राज्यकारभाराची तत्वे म्हणजेच पारदर्शकता, सेवा, कर्तव्यनिष्ठा, आणि न्याय – ही तत्वे जर आपल्याला आत्मसात करता आली, तर खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या कार्यास अभिवादन करू शकतो,” असेही अशोक जैन यांनी यावेळी सांगितले.

या ऐतिहासिक रॅलीमध्ये शेकडो चारचाकी वाहनांच्या माध्यमातून जिल्ह्यातून प्रेरणादायी यात्रा काढण्यात येणार असून, यामध्ये शहरातील व ग्रामीण भागातील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, आणि राजकीय नेते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. ही रॅली केवळ एक वाहन यात्रा नसून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्रिशताब्दी वर्षात सामूहिक अभिवादन करण्याचा एक सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक उपक्रम आहे.सदर भेटी प्रसंगी दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, मल्हार सेनेचे विभागीय अध्यक्ष डॉ. संजय पाटील, दिलीप नाझरकर,सचिन धनगर, अश्विन सैंदाणे आदी उपस्थित होते.


 

Next Post
चोरीच्या दोन सायकलींसह चोरटा जेरबंद: एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

चोरीच्या दोन सायकलींसह चोरटा जेरबंद: एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add