• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्याध्यापकाकडून पुन्हा लाचेची मागणी; दुसऱ्यांदा गुन्हा दाखल!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 30, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मुख्याध्यापकाकडून पुन्हा लाचेची मागणी; दुसऱ्यांदा गुन्हा दाखल!

जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील श्री. संत हरिहर माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन (वय ४५) यांच्याविरुद्ध एका शिपायाच्या पत्नीचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाजन यांच्याविरुद्ध यापूर्वीही वेतन निश्चितीच्या फरकापोटी लाच घेतल्याचा गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणी एका ३३ वर्षीय पुरुषाने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालयात शिपाई आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नीचे २३,८१५ रुपयांचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी मुख्याध्यापक संदिप महाजन यांच्याकडे सादर केले होते. हे बिल स्वतःच्या ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव आणि वेतन अधीक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक महाजन यांनी तक्रारदाराकडे ५,००० रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने २१ डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे याबाबत तक्रार दिली. पडताळणीअंती, मुख्याध्यापक महाजन यांनी वैद्यकीय बिल मंजूर करून देण्यासाठी तडजोडीअंती बिलाच्या एकूण रकमेच्या १५% प्रमाणे ३,६०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाच स्वीकारली नसली तरी, लाचेची मागणी करून ती मिळवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यापूर्वीही केली होती लाचखोरी..
मुख्याध्यापक संदिप महाजन यांनी यापूर्वीही तक्रारदार शिपाई यांच्याकडून वेतन निश्चितीच्या २,५३,७८० रुपयांच्या फरकापोटी ५% प्रमाणे १२,५०० रुपयांची मागणी करून १०,००० रुपयांची लाच स्वीकारली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात २७ जून २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवीन प्रकरणात देखील कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

या सापळा कारवाईचे नेतृत्व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. त्यांच्या पथकात सफौ सुरेश पाटील (चालक), पोहेकॉ किशोर महाजन, पो.ना. बाळू मराठे आणि पोकॉ प्रदीप पोळ यांचा समावेश होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन..
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने तुमचे शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 

Tags: #curationCrime
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी.. – अशोक जैन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी.. - अशोक जैन

ताज्या बातम्या

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले
गुन्हे

बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले

July 14, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add