• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एरंडोल हाणामारी प्रकरणी तिसऱ्या दिवशी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 29, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
एरंडोल हाणामारी प्रकरणी तिसऱ्या दिवशी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल शहरातील गाढवे गल्ली येथे रविवारी दि. २५ मे रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान एका कुटुंबावर शेजारच्या कुटुंबाने प्राणघातक हल्ला केला. फिर्यादीनुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गंभीर जखमी तरुणावर जळगावात उपचार सुरू होते. मात्र बुधवारी दिनांक २८ मे रोजी साडेअकरा वाजता उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात संशयित पाच आरोपींविरोधात खुनाचे कलम वाढवण्याचे काम सुरू होते.

अमोल कैलास पाटील (वय ३३, गाढवे गल्ली) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सचिन कैलास पाटील (वय २९, रा. गाढवे गल्ली, एरंडोल) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी हे गाढवे गल्ली येथे आई-वडील, दोन भाऊ व दोन्ही भावांच्या पत्नी, पुतणे यांच्यासह राहतात. त्यांच्या बाजूला तुकाराम उर्फ आप्पा सिताराम पाटील यांचे कुटुंब राहते. दोन्ही घरांच्या जवळची रिकामी जागा ही दोन्ही कुटुंब वाहन पार्किंग करण्याकरिता वापरत असतात. दरम्यान शनिवारी दि.२४ मे रोजी संशयित आरोपी तुकाराम पाटील व त्यांचा मुलगा आशिष उर्फ आशु याने मोकळ्या जागेत रेती व खडी टाकल्याबद्दल फिर्यादी सचिन पाटील यांना जाब विचारला होता. तसेच तुला उपटून मारेल असे आशिष उर्फ आशु पाटील यांनी फिर्यादी सचिन पाटील याला धमकावले होते. त्यावेळेला फिर्यादीचे वडील कैलास पाटील तेथे येऊन त्यांनी हा वाद मिटवला होता.

दरम्यान रविवारी दि. २५ मे रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास फिर्यादीचे कुटुंब हे घरी असताना त्यावेळेला फिर्यादीचे भाऊ अमोल पाटील हे नागदूली येथून ड्युटी वरून घरी आल्यावर त्याने मोकळ्या जागेत दुचाकी लावली. त्याचा पुन्हा संशयित आरोपींना राग आला. त्यांनी अमोल पाटील यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी दोन्ही कुटुंब हे घराबाहेर आले. आशिष उर्फ आशु व रोहित उर्फ बंटी याने लाकडी दांडके घेऊन घराबाहेर आले. त्याने अमोलला आज तुझे काम पक्के करून टाकू असे म्हणून हाता पायाला पोटाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली.

अमोलचे कुटुंबीय भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही तुकाराम पाटील यांच्या कुटुंबांने जबर मारहाण केली. अमोल पाटील हा घराच्या पायऱ्या चढत असताना आशिष उर्फ आशु तुकाराम पाटील याने त्याचे पाय धरून त्याला हवेत भिरकावून काँक्रिटीकरण रस्त्यावर डोके आपटून मारहाण केली. यामुळे अमोल पाटील गंभीर जखमी झाला आहे. रोहित उर्फ बंटी याने फिर्यादीची वहिनी दिपाली हिला गालावर चापट मारल्या तर उषाबाई तुकाराम पाटील हिने दगडफेक सुरू केली.

गंभीर जखमी अमोल पाटील याला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता त्यांनी जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. अमोल पाटील यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. या घटना प्रकरणी संशयित आरोपी तुकाराम उर्फ आप्पा सिताराम पाटील, रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटील, आशिष उर्फ तुकाराम पाटील, दीपक उर्फ गोलू नामदेव पाटील, उषाबाई तुकाराम पाटील या पाच संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या संशयित आरोपी विरोधात खुनाचे कलम वाढवण्याचे काम सुरू होते.


Tags: Crime
Next Post
मुख्याध्यापकाकडून पुन्हा लाचेची मागणी; दुसऱ्यांदा गुन्हा दाखल!

मुख्याध्यापकाकडून पुन्हा लाचेची मागणी; दुसऱ्यांदा गुन्हा दाखल!

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group