• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

परिचारिकेचा विनयभंग ; सुरक्षारक्षकालाही केली धक्काबुक्की !

जळगाव येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 16, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
परिचारिकेचा विनयभंग ; सुरक्षारक्षकालाही केली धक्काबुक्की !

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष क्रमांक १२ येथे एका परिचारिकेला विनयभंग करून दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार दि. १२ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जिल्हाभरातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. या ठिकाणी कक्ष क्रमांक १२ येथे संजय अनिल भोई (रा. एरंडोल) याचा अपघात झाल्याने तो कक्षामध्ये उपचार घेत आहे. सोमवार दि. १२ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फिर्यादी परिचारिका ह्या कर्तव्यावर असताना संशयित आरोपी गोलू वंजारी (रा. एरंडोल) याने परिचारिकेजवळ येऊन, त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत जाब विचारला असता गोलू वंजारी यानी, तुला काय करायचे ते कर असे म्हणत दमदाटी केली.

यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्याला बोलण्यास गेले असता सुरक्षारक्षकाला देखील दमदाटी करून धक्काबुक्की करीत संशयित आरोपी गोलू वंजारी तिथून निघून गेला. याबाबतची फिर्याद जिल्हापेठ पोलीस स्टेशनला परिचारिकेने दाखल केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहेत.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add