• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

आकाशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून माहिती आली समोर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 4, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील कालिका माता मंदिर परिसरात शनिवारी रात्री तरुणाचा धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. या प्रकरणांमध्ये ५ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादात हा खून झाल्याची माहिती फिर्यादीतून समोर आली आहे. दरम्यान २४ तासात पोलीस दलाकडून चार जणांच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत.

आकाश पंडित भावसार (सोनार वय २७, रा. अशोक नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान शनिवार दि. ३ मे रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आकाश याची पत्नी पूजा भावसार हिचा मावस भाऊ अजय मंगेश मोरे, चेतन रवींद्र सोनार आणि तीन अनोळखी इसम हे दोन स्कुटी वरती आकाशच्या घरी आले. त्यांनी आकाशबद्दल विचारणा केली तेव्हा पूजा हिने आकाशला फोन करून कुठे आहेस ? असे विचारले. आकाशने “श्री प्लाझा, ए वन भरीत सेंटर जवळ” असे सांगितल्यानंतर संशयित आरोपी अजय मोरे, चेतन सोनार आणि इतर तीन जण हे श्री प्लाझाच्या दिशेने निघून गेले.

त्यानंतर ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी श्री प्लाझा परिसरात आकाश भावसार याला घेरून धारदार हत्यारांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याच्यासोबत असलेले शैलेश पाटील आणि वैभव मिस्तरी हे घाबरून गल्लीबोळात पळून गेले. आकाश हा जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे पळत गेला. त्यावेळेला मारेकर्‍यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा धारदार हत्यारांनी गंभीर जखमी केले आणि पळून गेले होते. यानंतर कुणाल सोनार यांच्या मदतीने आकाश भावसार याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय पथकाने तपासून मयत घोषित केले.

याबाबत आकाश भावसार याची आई कोकिळाबाई पंडित भावसार (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अजय मंगेश मोरे हा आकाश भावसार सोनार यांच्या घरी अधून मधून येत होता. त्याचे आकाश याची पत्नी पूजा हिच्या सोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून आकाश सोबत अजय याचे वादविवाद झालेले आहेत. त्यामुळे अजय मोरे यानी सूडबुद्धीने त्याच्या साथीदारांसह मिळून त्याला जीवे ठार मारले, अशी फिर्याद कोकिळाबाई भावसार यांनी दिलेली आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफोनी साजिद मंसूरी हे करीत आहेत. तसेच आकाश याला चार दिवसांपूर्वी मारेकऱ्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, अशीही माहिती रुग्णालयात आकाशच्या बहिणीने दिली आहे.

२४ तासाच्या आत पोलिसांनी चार जणांना केली अटक..
आकाशची आई कोकिळाबाई भावसार यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय मंगेश मोरे यांच्यासह ४ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार शनिपेठ पोलीस स्टेशनसह जळगाव एलसीबीची टीम संशयित आरोपींच्या मागावर लागली होती. २४ तासांच्या आत जळगाव एलसीबीने याबाबत तपास करून ४ जणांना अटक केली आहे. यातील काही जण मित्रांकडे तर काही जण नातेवाईकांकडे लपून बसले असल्याचे एलसीबीला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीवरून कळाले होते. त्यानुसार अजय मंगेश मोरे (वय २८, कासमवाडी, जळगाव) याचेसह ३ अल्पवयीन या ४ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी कुणाल उर्फ सोनू चौधरी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.


Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group