जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांना एकाच दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेल्या. ही घटना १ मे रोजी सकाळी घडली असून, दोन्ही घटनांमधील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याबाबत पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
पहिली घटना प्रेमनगर परिसरात घडली. पूजा मनोज चांडक (वय ४२, रा. प्रेमनगर) या त्यांच्या परिसरातील एका मंदिराजवळ सकाळी फिरत होत्या. त्यावेळी मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची सोनपोत हिसका मारून पळवून नेत दुचाकीवर बसलेल्या आपल्या साथीदारासह पसार झाला. या घटनेनंतर काही वेळातच दुसरी घटना फॉरेस्ट कॉलनीजवळ घडली. संगीता राजेश कऱ्हे (वय ५२, रा. बहिणाबाई उद्यान परिसर) या मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोनपोत त्याच पद्धतीने चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.