• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वतःच्या मुलाला अभ्यास घेताना अमानुष मारहाण ; पालकावर गुन्हा दाखल

भडगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 2, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
स्वतःच्या मुलाला अभ्यास घेताना अमानुष मारहाण ; पालकावर गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळगाव येथे शाळेचा अभ्यास घेत असताना मुलास बेदम मारहाण करणाऱ्या पित्यावर भडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि घटना दि. २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे. पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होऊन याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

कोळगाव येथे एका लहान मुलाचा अभ्यास घेत असताना त्याचा पिता हा त्याला मारहाण व शिवीगाळ करीत होता. याबाबतचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सदर व्हिडिओबाबत माहिती घेतली असता भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कोळगाव ता. भडगाव येथील असल्याची खात्री भडगाव पोलिसांना झाली. भडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील, हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकार, कॉन्स्टेबल परदेशी, सुनील राजपूत अशांनी भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे जाऊन व्हायरल व्हिडिओमध्ये मुलास मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या पालकाचा शोध घेतला.

त्याने त्यांचे नाव सुनील भास्कर पवार (वय ५०,रा. कोळगाव ता. भडगाव) असे सांगितले. त्यावरून त्यास व्हायरल झालेल्या व्हिडिओ बाबत विचारपूस केली असता त्याने सदर व्हिडिओ हा माझाच आहे व माझ्या मुलाचा अभ्यास घेत होतो. तो शाळेत जात नसल्याने त्यास मारहाण व शिवीगाळ केल्याची त्याने कबुली दिली. त्यावरून भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार प्रवीण परदेशी यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन भडगाव पोलीस स्टेशन येथे संशयित आरोपी सुनील पवार याचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील हे करीत आहेत.

Next Post
जळगावात सायबर पोलीस स्टेशनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगावात सायबर पोलीस स्टेशनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स
क्रिडा

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

July 28, 2025
‘एक वृक्ष आईच्या नावे’ उपक्रमाचा शुभारंभ ; ५००० वृक्षांचे रोपण
जळगाव जिल्हा

‘एक वृक्ष आईच्या नावे’ उपक्रमाचा शुभारंभ ; ५००० वृक्षांचे रोपण

July 28, 2025
खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

July 28, 2025
लाडवंजारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आणि वैशाली वराडे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आणि वैशाली वराडे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार

July 28, 2025
रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान

July 27, 2025
जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर
गुन्हे

जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर

July 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group