• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्रीकृष्ण जन्म आणि विवाह सोहळ्याने भाविकांमध्ये चैतन्य

मेहरूणमध्ये संगीतमय भागवत कथा, हरीनाम कीर्तन सप्ताह

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 2, 2021
in धार्मिक
0
श्रीकृष्ण जन्म आणि विवाह सोहळ्याने भाविकांमध्ये चैतन्य

जळगाव, दि. 02 – येथील मेहरूण भागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेमध्ये भाविकांना दररोज परमेश्वर अनुभूती येत आहे. भागवत कथेवेळी भगवान श्रीकृष्ण जन्म आणि विवाह सोहळ्याच्या सजीव देखाव्याला भाविकांकडून उदंड प्रतिसाद लाभला. मेहरूण परिसरात या कीर्तन सप्ताहामध्ये धार्मिक उत्साह वाढला आहे.

बोदवड तालुक्यातील सुरवाडा येथील ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर हे दररोज दुपारी संगीतमय भागवत कथा सांगत आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा झाला. यात वासुदेवाच्या भूमिकेत उपशिक्षक मुकेश नाईक यांनी टोपलीत श्रीकृष्णाला घेऊन जात असल्याचा सजीव देखावा सादर केला. त्यांनतर महिला भाविकांनी श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा केला. भगवान श्रीकृष्णाचा महिमा ज्ञानेश्वर महाराज यांनी कथेमध्ये सांगितला.

मंगळवारी भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह सोहळ्याचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात भगवान श्रीकृष्णाची व रुख्मिणीची भूमिका अनुक्रमे संत ज्ञानेश्वर शैक्षणिक संस्थेचे सचिव मुकेश नाईक व त्यांच्या पत्नी स्वाती यांनी साकारला होता. सजीव देखाव्यामुळे भाविकांमध्ये चैतन्य पसरले होते. कृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी, एक आदर्श तत्वज्ञ, एक ज्ञानी आणि दैवी साधनसंपत्ती असलेला महान माणूस होता. श्रीकृष्णाच्या सर्व पत्नींमध्ये रुक्मिणीला सर्वोच्च दर्जा होता, असे मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराज यांनी केले.

प्रसंगी मेहरूणमधील नगरसेवक तथा मनपा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक व मेहरूण भागातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Next Post
श्रीमद् भागवत कथा दुःख नष्ट करणारे अमृत.. – ज्ञानेश्वर महाराज

श्रीमद् भागवत कथा दुःख नष्ट करणारे अमृत.. - ज्ञानेश्वर महाराज

ताज्या बातम्या

दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांवर आयुर्वेद ठरतंय वरदान; जळगावात अत्याधुनिक उपचार उपलब्ध!
आरोग्य

दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांवर आयुर्वेद ठरतंय वरदान; जळगावात अत्याधुनिक उपचार उपलब्ध!

June 13, 2026
धडक कारवाई! चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या
गुन्हे

धडक कारवाई! चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या

June 12, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश
शैक्षणिक

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश

June 12, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 12, 2026
मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई
गुन्हे

मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई

June 12, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर अत्याधुनिक ‘लेझर’ उपचार; महात्मा फुले व आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत सेवा!
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर अत्याधुनिक ‘लेझर’ उपचार; महात्मा फुले व आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत सेवा!

June 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group