• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने पीक जळून खाक

सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान ; चोपडा तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 26, 2025
in कृषी
0
कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने पीक जळून खाक

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अडावद येथे कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने सुमारे एक हेक्टरवरील मका जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २२ रोजी दुपारच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे.

येथील वटार रस्त्यावरील किशोर धोंडू पाटील यांनी १ हेक्टर २७ आर. क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली होती. मका कापणीवर आल्याने २० रोजी मका कापून ठेवला होता. दरम्यान, २२ रोजी दुपारी अचानक शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागल्याने संपूर्ण मका जळून खाक झाला.

या शेतातून वीजतारा गेल्या असून ह्या तारा लोंबकळलेल्या असल्यानेच हा प्रकार घडल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान, २३ रोजी अडावदचे तलाठी विजेंद्र पाटील, कोतवाल मनोज पारधी यांनी आग लागलेल्या शेतात पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

Next Post
गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या ; सावदा शहरातील घटना

गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या ; सावदा शहरातील घटना

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add