• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विहिरीत पाय घसरून पडल्याने जवानाचा बुडून मृत्यू

सुट्टीवर असल्याने शेतात फेरफटका मारताना घडली घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
विहिरीत पाय घसरून पडल्याने जवानाचा बुडून मृत्यू

पाचोरा, (प्रतिनिधी) : सुट्टीवर आलेल्या जवानाचा विहिरीत पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. २४ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

सैनिक रवींद्र पंडितराव पाटील (वय ३८ वर्ष) असे मयत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. भडगाव येथून जवळच असलेल्या बांबरुड खुर्द ता. पाचोरा येथील रहिवासी व आसाम रायफल शिलॉंग येथे नोकरीस होता. हा जवान दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शेतात फेरफटका मारायला गेला असता त्याचा विहिरीत पाय घसरून विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे चुलत भाऊ गोपाल पाटील हा सकाळी ११ वाजता शेतात गेला असता विहिरीजवळ चप्पल, रुमाल दिसल्याने रविंद्र पाटील हा विहिरीच्या पाण्यात पडला असावा असा संशय त्याला आला.

याबाबत घटनेची वार्ता गावात पोहोचताच नातेवाईकांसह नागरिकांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पाचोरा येथील हुसेन शेख यांना बोलवण्यात आले. त्यांनी विहिरीच्या पाण्यातून रविंद्र पाटील यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. जवानाला भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Next Post
पावसाळ्यापूर्वी घरकुल बांधकामाची कामे पूर्ण करा.. – सीईओ मीनल करनवाल

पावसाळ्यापूर्वी घरकुल बांधकामाची कामे पूर्ण करा.. - सीईओ मीनल करनवाल

ताज्या बातम्या

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add