• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाजपचे नेते स्वर्गीय उदय वाघ यांच्या स्मृतींना उजाळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 29, 2021
in जळगाव जिल्हा
0
भाजपचे नेते स्वर्गीय उदय वाघ यांच्या स्मृतींना उजाळा

अमळनेर, दि. 29 – भाजपचे नेते स्व. उदय वाघ यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्व पक्षीय नेते व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी स्मारकावर येऊन अभिवादन केले. यावेळी स्मारक स्थळी उदय वाघ यांच्या जीवनपटाचे चित्र प्रदर्शन करण्यात आले. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

स्व. उदय वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्त धुळे रोड वरील स्मारकावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. उदय वाघ यांचे चरित्र लिहिले तर एकनाथराव खडसे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे खडसे यांनी सांगताच भाजप कार्यकर्ते भावनाविवश झाले. खासदार उन्मेष पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, बाजार समितीचे मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, भैरवी पलांडे, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, धरणगावचे ज्ञानेश्वर महाजन, खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ संदेश गुजराथी, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडा, अर्बन बँकेचे संचालक पंकज मुंदडा, वसुंधरा लांडगे, अभिषेक पाटील, प्रवीण जैन, बाजार समितीचे माजी सभापती प्रफुल पाटील, माजी संचालक विजय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, किशोर काळकर, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष श्याम पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रकाश ताळे, डॉ आशिष पाटील, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, शिवसेनेचे महेश देशमुख, जिप सदस्य मीनाताई पाटील, संगीता भिल, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, शीतल देशमुख, सरचिटणीस राकेश पाटील, जिजाब पाटील, राहुल पाटील, बबलू राजपूत, शिक्षण संस्था संघटना अध्यक्ष जयवंतराव पाटील, ग्रामसेवक संघटना यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

स्मारक स्थळी भैरवी पलांडे यांच्या संकल्पनेतून राकेश पाटील , उमेश वाल्हे, शीतल देशमुख, चंद्रकांत कंखरे यांनी स्व. उदय वाघ यांच्या विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी परिषद ते राज्याच्या राजकारणापर्यंत महत्वाच्या घडामोडीचे टिपलेले प्रसंग, आंदोलने, मोर्चे, बैठकी, संघर्ष, लढा, पक्ष संघटन यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते. राजकारणापलीकडे आणि समाज कारणापलीकडे असलेल्या मैत्रीच्या स्मृतींना विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उजाळा दिला. दिवसभरात हजारो कार्यकर्ते व मित्रपरिवाराने वाघ याना अभिवादन केले.

Next Post
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

ताज्या बातम्या

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जळगाव जिल्हा

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा
जळगाव जिल्हा

‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा

August 10, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add