• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालिकेला बिबट्याने केले ठार ; शेतकऱ्यांमध्ये भीतीसह संतापाचे वातावरण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
बालिकेला बिबट्याने केले ठार ; शेतकऱ्यांमध्ये भीतीसह संतापाचे वातावरण

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील डांभुर्णी शिवारात मेंढपाळ कुटुंबातील बालिकेला बिबट्याने ठार केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावल तालुक्यातील किनगाव शिवारात बालकाला बिबट्याने ठार केल्यावर आता हि दुसरी घटना घडली आहे.

तालुक्यातील डांभुर्णी येथील प्रभाकर चौधरी यांच्या शेत शिवारात गट क्र. ७४१ मध्ये ठेलारी समाजातील मेंढपाळांचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसापासून वास्तवाला आहेत. दरम्यान बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील रत्‍नाबाई सतिश रुपनर (वय २ वर्षे) या चिमुकलीला उचलून नेले. हि बालिका आई जिजाबाई रूपनर हिच्यासोबत झोपलेली असतांना बिबट्याने झडप घालून तिला उचलून केळीच्या बागेत पसार झाला. त्यांनी आरडाओरडा केला असला तरी रात्रीची वेळ असल्याने बिबट्या लागलीच पसार झाला. तर या बालिकेचा शोध घेतला असता थोड्या अंतरावर तिच्या शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच रात्री वन अधिकारी विपुल पाटील, पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे व अन्य सहकाऱ्यांचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले. डांभुर्णी येथील पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनंतर यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर व त्यांचे सहकारी देखील रात्रीच येथे दाखल झाले. या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्मित झाले आहे. आधीच दिवसा वीज नसल्याने रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शिवारात जावे लागते. यातच बिबट्याची परिसरात दहशत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

Next Post
आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडेला श्री शिव छत्रपती पुरस्कार घोषित

आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडेला श्री शिव छत्रपती पुरस्कार घोषित

ताज्या बातम्या

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!
खान्देश

कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group