• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

म्हशी धुताना तरुणाचा नदीत बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 2, 2025
in जळगाव जिल्हा
0
म्हशी धुताना तरुणाचा नदीत बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पुनगांव येथील २२ वर्षीय तरुण गुढीपाडव्याच्या दिवशी म्हशी धुण्यासाठी गिरणा नदीत गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला २२ वर्षीय मुलगा अल्केन परदेशी हा वडिलांना शेती कामात व गुरांना चारा पाणी करण्यासाठी नेहमीच मदत करीत होता. शेतकरी जीवन परदेशी यांचा एकुलता एक मुलगा आहे. दि.३० एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो म्हशींना पाणी पिण्यासाठी व धुण्यासाठी गिरणा नदी पात्रात घेऊन गेला होता. म्हशी खोल पाण्यात जात असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तो पाण्यात उतरला व त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.

नदीपात्रातील काही लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला वाचवण्यासाठी धाव घेत वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यात वाचवणाऱ्यांना यश आले नाही. लगेचच त्याला पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. अल्केन परदेशी याचा गुढीपाडव्याच्या दिवशीच पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आई वडिलांचा एकुलता एक २२ वर्षीय तरुणाचा सणासुदीच्या दिवशी मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
रिक्षा प्रवासात प्रौढाचे २५ हजार रुपये लांबविले ; रिक्षा चालकासह चोरट्यांना अटक

रिक्षा प्रवासात प्रौढाचे २५ हजार रुपये लांबविले ; रिक्षा चालकासह चोरट्यांना अटक

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add