• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डिव्हायडरला दुचाकी आदळल्याने एक ठार, एक जखमी ; नशिराबाद उड्डाणपूलावरील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
डिव्हायडरला दुचाकी आदळल्याने एक ठार, एक जखमी ; नशिराबाद उड्डाणपूलावरील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीच्या भीषण अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम करीत होते.

चैतन्य सुपडू फेगडे (वय २६ रा.निंभोरा ता. रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा भाऊ चेतन हेगडे गंभीर जखमी झाला आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा गावात राहणारा चैतन्य सुपडू फेगडे हा तरुण भाऊ चेतन, आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. घरकुल योजनेसंदर्भातची फाईलच्या कामानिमित्ताने चैतन्य हा भाऊ चेतन आणि वडील यांच्यासोबत सोमवारी ३१ मार्च रोजी जळगावला निघाले. दरम्यान चैतन्यचे वडील रिक्षाने पुढे निघाले तर चेतन आणि चैतन्य हे दोघे भाऊ दुचाकी (क्रमांक एमएच १९ इइ १७०२) ने भुसावळकडून जळगावकडे येण्यासाठी निघाले.

त्यावेळी जळगावपासून जवळ असलेल्या नशिराबाद गावातील उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी डिव्हायडरला जोरदार धडकली. या भीषण अपघातात चैतन्य याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ चेतन फेगडे हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघात घडल्यावर नशिराबाद पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमी झालेल्या चेतनला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या संदर्भात पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयत चैतन्य हा एक वर्षापूर्वी रेल्वे विभागात नोकरीला लागलेला होता. या घटनेमुळे निंभोरा गावावर शोककळा पसरली आहे. तर खाजगी रुग्णालयात चेतनवर उपचार सुरू आहेत.

Next Post
वीज पडून १५ वर्षीय बालकाचा मृत्यू ; तर आजोबा गंभीर जखमी !

वीज पडून १५ वर्षीय बालकाचा मृत्यू ; तर आजोबा गंभीर जखमी !

ताज्या बातम्या

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश
आरोग्य

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026
बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
आरोग्य

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

July 1, 2026
आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

July 1, 2026
जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group