• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालरंगभूमी परिषदेच्या मोफत आरोग्य शिबिराचा ४५ कलावंतांनी घेतला लाभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
बालरंगभूमी परिषदेच्या मोफत आरोग्य शिबिराचा ४५ कलावंतांनी घेतला लाभ

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील बालकांच्या सर्वांगिण कलाविकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कलावंतांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आज (दि.७) डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय संचलित महादेव हॉस्पिटल, जुने गणपती हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या उपक्रमाचे बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी फाऊंडेशन डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ.रिषभ पाटील व समन्वयक रत्नकिशोर जैन, बालरंगभूमी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांच्या हस्ते नटराज पूजन करुन शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी केले.
या शिबिरात शहरातील ४५ कलावंतांनी सहभाग घेतला होता. या कलावंतांची इसीजी, रक्तातील शुगर, ब्लडप्रेशर व टूडी इको हृदयतपासणी करण्यात आली. यापैकी २ कलावंतांना पुढील अधिक तपासण्या व उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

बालरंगभूमी परिषदेतर्फे या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनाबद्दल नृत्य, नाट्य, संगीत तसेच लोककला कलावंतांतर्फे परिषदेचे आभार मानण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेची कार्यकारिणी, पदाधिकारी सदस्य सुदर्शन पाटील, मोहित पाटील, दर्शन गुजराथी, नेहा पवार, पंकज बारी व गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर, तंत्रज्ञ व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Next Post
जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे फाटक दुरुस्तीसाठी बंद

जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे फाटक दुरुस्तीसाठी बंद

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add